मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मालेगाव हादरलं! स्विमिंग पूलमध्ये उतरताच तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका, सीसीटीव्हीत घटना कैद

मालेगाव हादरलं! स्विमिंग पूलमध्ये उतरताच तरुणाला हृदयविकाराचा तीव्र झटका, सीसीटीव्हीत घटना कैद

मालेगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहताना एका तरुणाचा हृदयविकराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.

मालेगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहताना एका तरुणाचा हृदयविकराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.

मालेगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहताना एका तरुणाचा हृदयविकराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Malegaon, India

नाशिक, 30 ऑगस्ट : मालेगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहताना एका तरुणाचा हृदय विकराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या तरुणाचं वय अवघं 19 वर्षे इतकं होतं. मृतक कुटुंबाचं जयेश भावसार असं नाव आहे. या घटनेमुळे भावसार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सध्या हार्ट अटॅकने मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिममध्ये व्यायाम करताना, जॉगिंग करताना काहींचा मृत्यू झाला आहे. मालेगावात स्विमिंग पुलात पोहताना हृदय विकाराच्या धक्क्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मालेगावात घडली. जयेश भावसार असे या तरुणाचे नाव आहे. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

(कोरोनाने निधन झालेल्यांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान मिळेना, तर शासनाने काहींना डबल दिले 50 हजार)

शहरातील शिवाजी नगर भागात अस्पायर क्लबचे स्विमिंग पूल आहे. जयेश नेहमी त्यात पोहण्यासाठी गेला होता. जयेशने स्विमिंग पुलात उडी मारल्यानंतर तो पोहत असतांना त्याला त्रास जाणवला आणि तो स्विमिंग पुलातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र त्रास वाढल्यामुळे त्याला बाहेर पडता आले नाही. तिथे उपस्थित असलेल्या इतरांनी त्याला बाहेर काढून तोंडाने श्वास दिल्यानंतर एकदा जयेश उठला. मात्र त्यानंतर त्याला मृत्यूने गाठले आणि त्याचा अखेर मृत्यू झाला.

First published:
top videos

    Tags: Malegaon, Malegaon news