Home /News /maharashtra /

Nashik : निराधार वृद्धांना 'वात्सल्य' देणारं नाशिकचं सेकंड होम, 11 वर्षांपासून सुरू आहे अविरत सेवा VIDEO

Nashik : निराधार वृद्धांना 'वात्सल्य' देणारं नाशिकचं सेकंड होम, 11 वर्षांपासून सुरू आहे अविरत सेवा VIDEO

title=

नाशिकच्या पंचवटी (Nashik-Panchavati) परिसरात सतीश सोनार यांनी वात्सल्य वृद्धाश्रमाची (Vatsalya Vruddhashram) स्थापना केली आहे. त्या माध्यमातून ते अनाथ,बेघर ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत आहेत.

  नाशिक 6 ऑगस्ट : अनेक जण आपल्या पालकांना वृद्धाश्रमात ठेवतात किंवा कधी कधी वृद्ध स्वतःच तिथे जाऊन राहतात. अशाच अनाथांना आधार देण हीच ईश्वर सेवा समजून गेल्या 11 वर्षांपासून सतीश सोनार (Satish Sonar) आणि त्यांच कुटुंब अनाथांची अविरत सेवा करत आहे. नाशिकच्या पंचवटी (Nashik-Panchavati) परिसरात त्यांनी वात्सल्य वृद्धाश्रमाची (Vatsalya Vruddhashram) स्थापना केली आहे. त्या माध्यमातून ते अनाथ,बेघर ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत आहेत. सध्या त्यांच्या या वृध्दाश्रमात 70 ते 80 आजी -आजोबा आहेत. कोणाला मुल नाही,कोणी बेघर आहे. कोणाला त्यांची मुल संभाळत नाहीत अशा सर्व वृद्धांची ते आपल्या या वात्सल्य वृद्धाश्रमात काळजी घेतात. जशी घरी आपली व्यवस्था असते अगदी सर्व या वृद्धाश्रमात ते आजी -आजोबांना पुरवतात. त्यांच्या या सेवाकार्यात ओम ठेपने यांचा ही चांगला सहभाग आहे. ओम दिवसरात्र वृध्दाश्रमातच असतात.

   हेही वाचा-  Beed : दुष्काळी भागात फुलवली ‘फळबाग’; आता शेतीतून लाखोंची कमाई, पाहा VIDEO

  अनाथांना आनंद देण्यातच खरा आनंद  वात्सल्य वृध्दाश्रम स्थापन करण्यामागचा माझा एकमेव हेतू म्हणजे, बेघर, अनाथ ज्येष्ठ नागरिकांना आधार देणे हा आहे. कारण आज ही समाजात अशी अनेक लोक आहेत. त्यांना कोणी सांभाळत नाही. त्यामुळे ते आपल जीवन असच इकडे तिकडे फिरून घालवतात. त्यामुळे त्यांना आधार मिळणे गरजेचे आहे. याच समाजभावणेतून मी हे काम सुरू केलं आहे. या समाजसेवेत माझ्या घरच्या परिवाराचा ही खूप मोठा वाटा आहे. ते ही वेळोवेळी मदत करतात. ही सेवा पूर्णतः गरजू नागरिकांसाठी मोफत केली जात आहे. इथं राहणाऱ्या आजी-आजोबांवर कोणतेही बंधन नाही ते अगदी मोकळ्यापणाने इथं राहतात. विशेष म्हणजे असे ही काही ज्येष्ठ नागरिक आहेत की ते सतत आजारी असतात. आम्ही त्यांच्यावर वेळोवेळी उपचार करतो त्यांची सेवा करतो त्यांना कोणताही कमी पणा जाणवू देत नाही, अशी प्रतिक्रिया सतीश सोनार यांनी दिली आहे. वात्सल्य वृध्दाश्रम कुठे आहे ? नाशिकच्या पंचवटी मधील दामोदर नगर गार्डन जवळ, हिरावाडी रोड, दवे फरसाण समोर वात्सल्य वृध्दाश्रम आहे.  या वृध्दाश्रमाशी संपर्क साधायचा असल्यास 7387386333 या नंबरवर संपर्क साधू शकता. गुगल मॅप वरून साभार हेही वाचा-  Yog Yogeshwar Jay Shankar : घरबसल्या घ्या शंकर महाराजांच्या मठाचं दर्शन, VIDEO वात्सल्यचं आता आमचं घर इथं आम्हाला राहताना अस वाटत नाही की आपण बाहेर आहोत अगदी घरच्या सारखं वाटत आनंदात आम्ही सर्व मिळून मिसळून राहतो. माझी मुलगी मला सारखी फोन करत असते. मात्र, मी तिच्या फोनकडे सुधा लक्ष देत नाही कारण इथल्या प्रसन्नमय वातावरणात आम्ही सर्वच विसरून जातो. आमची इथं खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते. आता जवळपास मला चार वर्षे या वृद्धाश्रमात झाली मात्र कोणाचीही आठवण येत नाही,अशी प्रतिक्रिया वृद्धाश्रमात राहणाऱ्या चारुलत्ता अनगोळकर (Charulatta Aangolkar) यांनी दिली आहे. माझे घरचे येतात आणि मला घेऊन जातात. मी पुन्हा या ठिकाणी येते मला आता वात्सल्यचं घर वाटू लागल आहे. कारण या वृद्धाश्रमात राहणारे सर्वजण अगदी स्वइच्छेने राहतात. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत वातावरण हसत खेळत असत चांगल्या प्रकारचे जेवण असते अनेक नागरिक या वृद्धाश्रमाला भेट देतात, अशी प्रतिक्रिया वात्सल्य वृद्धाश्रमात राहणाऱ्या विजया शहाणे (Vijaya Shahane) यांनी दिली आहे.
  First published:

  Tags: Nashik, Senior citizen

  पुढील बातम्या