मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed : दुष्काळी भागात फुलवली ‘फळबाग’; आता शेतीतून लाखोंची कमाई, पाहा VIDEO

Beed : दुष्काळी भागात फुलवली ‘फळबाग’; आता शेतीतून लाखोंची कमाई, पाहा VIDEO

X
शेतकऱ्यांना

शेतकऱ्यांना फळबागेतून मिळणारे उत्पन्न घटत आहे. मात्र, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आधुनिक फळबागेची लागवड करत (fruits farming) लाखोंचे उत्पन्न घेतले आहे.

शेतकऱ्यांना फळबागेतून मिळणारे उत्पन्न घटत आहे. मात्र, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आधुनिक फळबागेची लागवड करत (fruits farming) लाखोंचे उत्पन्न घेतले आहे.

बीड 5 ऑगस्ट : दुष्काळी जिल्हा (Drought district) अशी ओळख असलेला बीड जिल्हा आता प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे आपली दुष्काळी ओळख पुसून टाकू लागला आहे. जिल्ह्यात पावसाची अनियमितता आणि हवामान बदलामुळे फळबागांवर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो. अनेक शेतकऱ्यांना फळबागेतून मिळणारे उत्पन्न देखील घटल्याचे समोर आले. मात्र, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आधुनिक फळबागेची लागवड करत (fruits farming) लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याची ही प्रेरणादायी यशोगाथा.

जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील धूनकवडगाव हे डोंगर माथ्यावर वसलेलं गाव. गाव अगदी छोटसं. सतत पाण्याची कमतरता आणि खडकाळ जमीन यामुळे अधिक उत्पन्न मिळणे कठीण आहे. परंतु अशा खडकाळ जमिनीवर देखील अधिक उत्पन्न काढता येऊ शकते, अशा निश्चय गावातील कल्याण कुलकर्णी यांनी केला. कुलकर्णी तसे पेशाने सरकारी नोकरदार आहेत. मात्र, शेतीची आवड असल्याने त्यांनी नोकरी सांभाळत फळबाग लागवड करण्याचा प्रयोग हाती घेतला. यातून कुलकर्णी यांनी 30 एकर क्षेत्रावर फळबागेची लागवड केली.

कुलकर्णी यांच्या फळबागेत ड्रॅगन फ्रूट, मोसंबी, जांभूळ, सीताफळ, केशर आंबा नारळ अशा अनेक फळांची लागवड करण्यात आली आहे. हंगामानुसार ते या फळबागांची लागवड करतात. 2012 साली लागवड झालेली फळबाग आता चांगले उत्पन्न मिळवून देत आहे. आज या फळबागेतून कुलकर्णी यांना लाखोंची कमाई होत आहे.

2000 ड्रॅगन फ्रूट झाडांची लागवड 

4 एकर जमिनीवर मोसंबीचे 700 झाडे लावण्यात आली आहे. तर 7 एकरावर डाळिंबाची लागवड करण्यात आलेली आहे. यासह केशर आंब्याचे 1200 झाडे असून 1 एकर क्षेत्रावर 2000 ड्रॅगन फ्रूट झाडांची लागवड करण्यात आली आहे. तर सीताफळाचे 1600 आणि 250 झाडे नारळाची लावण्यात आली आहेत.

फळांची परराज्यात देखील विक्री

एका डाळिंबाच्या हंगामातून 70 ते 80 टन उत्पादन हाती आले आहे. यातून त्यांच्या हाती 25 लाख रुपये उत्पन्न मिळाले. गतवर्षी 12 टन सीताफळ उत्पादन झाले असून यातून त्यांना 7 लाखा रुपयाचे नफा मिळाला. केशर आंब्याची 3 ते 4 टन परराज्यात देखील विक्री झाली यातून 13 लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले. यावर्षी मोसंबीचे 30 ते 40 टन उत्पादन होणार असून यातून 7 ते 8 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे.

 800 ते 900 ग्राम वजनाचे सीताफळ

कल्याण कुलकर्णी यांना सीताफळाची शेती मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरली आहे. गेल्या वर्षी कोलकाता, हैदराबाद येथील बाजारपेठ सीताफळाची विक्री झाली आहे. सीताफळाचे गोल्डन उत्पादन होते. एका सीताफळाचे वजन 800 ते 900 ग्रामपर्यंत भरते. अशा सीताफळांना मोठी मागणी असल्याचे कुलकर्णी सांगतात.

सेंद्रिय खतांवर भर

रासायनिक खताबरोबरच पिके आणि फळबागांना शेणखत कोंबडी खत आणि सेंद्रिय खताची मात्रा अधिक देण्यात येते. कुलकर्णी यांच्याकडे दोन गावरान बैलांसह चार गावरान गाई आहेत. जनावरांचे मलमूत्र बाजूच्या हौदात साठवून त्यात गूळ व बेसन पीठ टाकून ठिबकच्या माध्यमातून झाडांपर्यंत सोडले जाते. वर्षाला 100 ट्रॉली शेणखत शेतात टाकला जातो. शेणखताचा पिकांना फायदा होऊन उत्पन्नात वाढ होते.

एक कोटी लीटर क्षमतेचे शेततळे

डोंगर माथ्यावर एक कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता असणारे शेततळे उभारण्यात आले आहे. यामुळे फळबागांना चार महिने पाणीपुरवठा करणे शक्य होते. उंचीवर शेततळे असल्यामुळे कुठल्याही विद्युत उपकरणाशिवाय शेताला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. आवश्यक तेवढे पाणी मिळाल्याने पिके अधिकच बहरलेले दिसून येतात.

शेतात नवनवीन प्रयोग करावेत

मागील वीस वर्षा पासून मी शेती करत असून पारंपारिक शेतीला फाटा देत मागील बारा वर्षापासून फळबागेची लागवड केली. कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न मिळू लागले आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करावी. शेतात नवनवीन प्रयोग करावेत. यासाठी आवश्यक असल्यास मार्गदर्शन देखील घ्यावे, असे कल्याण कुलकर्णी  (संपर्क क्रमांक- 9422745544) यांनी सांगितले.

First published:

Tags: Beed, Beed news, बीड, शेतकरी