जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ganeshotsav 2022 : नाशिककरांनी पाहिलेच पाहिजेत असे टॉप गणपती, प्रत्येक बाप्पा आहे खास

Ganeshotsav 2022 : नाशिककरांनी पाहिलेच पाहिजेत असे टॉप गणपती, प्रत्येक बाप्पा आहे खास

Ganeshotsav 2022 : नाशिककरांनी पाहिलेच पाहिजेत असे टॉप गणपती, प्रत्येक बाप्पा आहे खास

या गणेशोत्सवात नाशिक मधील कोणते गणपती तुम्ही नक्की पाहिले पाहिजेत ते जाणून घ्या.

  • -MIN READ Nashik,Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    नाशिक 02 सप्टेंबर : सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन झालं असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. यदा तब्बल दोन वर्षांनी कोरोना निर्बंधांशिवाय गणेशोत्सव साजरा ( Ganeshotsav 2022 ) होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. नाशिक शहरातही यंदा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. वेगवेगळे देखावे नाशिक मधील मंडळानी तयार केले आहेत. त्यामुळे नाशिक मधील हे सहा गणपती तुम्ही नक्कीच पाहिले पाहिजेत. भद्रकालीचा राजा  या गणपतीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. नटराज मित्र मंडळातर्फे गेल्या 60 वर्षांपासून या गणपतीची स्थापना केली जाते. तब्बल 21 फूट उंचीची ही गणेश मूर्ती आहे. विशेष म्हणजे 365 दिवस भक्तांना दर्शन घेता येते. नवसाला पावणारा गणपती म्हणून देखील या गणपतीची ख्याती सर्वदूर आहे. हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे भक्त वर्षभर गणपतीची सेवा करत असतात. त्यामुळे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. यावर्षी राज दरबारचा देखावा या ठिकाणी उभारण्यात आला आहे. साक्षी गणेश  भारत मित्र मंडळ 1957 पासून या गणपतीची स्थापना करत आहे. साक्षी गणेश मंदिर हे नाशिकच प्रसिद्ध मंदिर आहे. दररोज शेकडो भाविक गणरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. मंडळाचे कार्यकर्ते गणेशोत्सव काळात विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. त्यामुळे नाशिक मधील या गणपतीला नक्की भेट द्या. Ganeshotsav 2022 : यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील ‘हे’ 10 गणपती नक्की पाहा

     नाशिकचा महागणपती

    नाशिकचा मानाचा राजा म्हणून महागणपतीची ओळख आहे. माजी महापौर विनायक पांडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेवा मित्र मंडळ जवळपास 50 वर्षांपासून शालिमार मेनरोड चौकात या महागणपतीची स्थापना करत आहे. गणपती उत्सव काळात शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. लेझर शो या गणपतीचा मुख्य आकर्षक देखावा असतो. मालेगाव स्टँडचा राजा  मालेगाव स्टँड मित्र मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून या गणपतीची स्थापना करत आहे. दरवर्षी हे मंडळ विविध सामाजिक संदेश देणारे देखावे साकारत असते. यावर्षी या मंडळाने महिमा खंडेरायाचा हा अतिशय सुंदर देखावा साकारला आहे. सत्यबाल मंडळाचा राजा  हे मंडळ 1987 पासून गणपतीची स्थापना करत आहे. या मंडळाचा देखील दरवर्षी आकर्षक देखावा असतो. यावर्षी 40 फूट उंचीचा मयुरेश्वर देखावा साकारला आहे. भाविक मोठ्या प्रमाणात हा देखावा बघण्यासाठी गर्दी करत आहेत. हे नाही पाहिलं तर काय पाहिलं? यंदा आवर्जून भेट द्यावी अशी मुंबईतील 10 प्रसिद्ध गणेश मंडळ

     नाशिकचा राजा

    मानाचा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. सर्वच नाशिककरांची या गणपतीवर श्रद्धा आहे. दरवर्षी नाशिकचा राजा मित्र मंडळ सामाजिक संदेश गणेशोत्सवात देत असतो. गणेशोत्सव काळात भाविक मोठ्या प्रमाणात येथे दर्शनासाठी येत असतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात