जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ganeshotsav 2022 : यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील 'हे' 10 गणपती नक्की पाहा

Ganeshotsav 2022 : यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील 'हे' 10 गणपती नक्की पाहा

पुण्यातील हे 10 गणपती या गणेशोत्सवात नक्की पाहायला हवेत.

पुण्यातील हे 10 गणपती या गणेशोत्सवात नक्की पाहायला हवेत.

या गणेशोत्सवात पुण्यातील कोणते 10 गणपती तुम्ही नक्की पाहिले पाहिजेत (Top 10 Ganesh Pandals in Pune) ते जाणून घ्या

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 1 सप्टेंबर : सार्वजनिक उत्सवांना सर्वप्रथम पुण्यात सुरूवात झाली आणि त्यानंतर तो देशभर पसरला. अगदी पहिल्या वर्षापासून पुण्यातील गणपतीचे सर्वांना आकर्षण असते. यंदा दोन वर्षांच्या ब्रेकनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय गणेशोत्सव होत आहे. या गणेशोत्सवात पुण्यातील कोणते 10 गणपती तुम्ही नक्की पाहिले पाहिजेत (Top 10 Ganesh Pandals in Pune)  ते जाणून घ्या श्री कसबा गणपती

    News18

    कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत. शहाजी राजे यांनी 1636 मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला.  कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 साली सुरुवात झाली. पुण्यातील मानाचा पहिला गणपती म्हणून तो प्रसिद्ध आहे. तांबडी जोगेश्वरी

    News18

    पुण्यातील दुसरा मानाचा गणपती. ही पुण्याची ग्रामदेवता. म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाल आहे. कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही 1893 पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात. श्री गुरूजी तालीम गणपती

    News18

    लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. श्री तुळशीबाग गणपती

    News18

    पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबागेतला गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षित तुळशीबागवाले यांनी 1900 साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली. श्री केसरी गणपती

    News18

    पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा गणपती आहे केसरी गणपती. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव 1894 पासून सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. पण 1905 पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. श्रीमंत दगडूशेठ गणपती

    News18

    संपूर्ण जगभर हा गणपती प्रसिद्ध आहे. दरवर्षी दगडूशेठ गणपतीकडून वेगवेगळ्या मंदिरांच्या महालांचे देखावे सादर करतात.   यावर्षी श्री पंचकेदार मंदिर हा देखावा दगडूशेठ गणपतीचे देखावा म्हणून उभारला आहे. भाजी मंडईचे शारदा गणपती मित्र मंडळ

    News18

    अखिल महात्मा फुले भाजी मंडईचे शारदा गणपती मित्र मंडळ हे देखील पुण्यातील सुप्रसिद्ध गणेश मंडळ म्हणून ओळखले जाते हा गणपती पुण्यातील मध्यवर्ती असलेल्या भाजी मंडई येथे असून गणेश आणि शारदाची अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला येथे पाहायला मिळते. हुतात्मा बाबू गेनू मंडळ

    News18

    हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा देखावा देखील नेहमी लक्षवेधी असतो. यावर्षी या मंडळाने प्रती शिर्डीचा देखावा तयार केला असून त्याला गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे. भाऊ रंगारी गणेश मंडळ

    News18

    देशातील जुन्या सार्वजनिक गणेशमंडळांमध्ये याची ओळख आहे. या मंडळानं यंदा दिल्ली येथील स्वामीनारायण मंदिराचा देखावा तयार केलेला आहे. हत्ती गणपती

    News18

    पुण्यातील मध्यवस्थीत असलेल्या हत्ती गणपतीचा देखावा पाहण्यासाठी पुणेकर दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यावर्षी या मंडळानं श्रीकृष्णाच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांचा देखावा सादर केला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात