नाशिक,11 मार्च: फेब्रुवारी आणि मार्च महिना असल्यामुळे सध्या सर्व शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांचा घरात परीक्षेचे (School exams) वारे वाहू लागले आहेत परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या पाल्यांनी चांगल्या शाळेमध्ये प्रवेश (Admissions in best schools) घ्यावा किंवा चांगल्या शाळेत असतील तर पाल्यांनी उत्त्तरोत्तर प्रगती करावी अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. त्यात आता परिक्षानंतर पहिली आणि पाचवीच्या प्रवेशांचं (School admissions 2022) सत्र सुरु होणार आहे. आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत (Best schools in Maharashtra) प्रवेश मिळावा पालकांमध्ये अक्षरशः शर्यत लागली असते. RTE च्या अंतर्गत प्रवेश (How to get RTE Admissions) मिळवण्यासाठी कित्येक पालक तासंतास शाळांसमोर रांगेत उभे असतात. पण आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिक्षण घ्यावं अशी तुमचीही इच्छा असेल आणि तुम्ही चांगल्या शाळांच्या शोधात (How to get Admission in best school) असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला नाशिक शहरातील टॉप 5 शाळा (Top 5 schools in Nashik List) आणि या शाळांबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पाल्यांना उत्तम शिक्षण घेण्यास (Best educational schools in Nashik) मदत होईल. चला तर जाणून घेऊया संपूर्ण लिस्ट (List of best schools in Nashik). 1. विद्या प्रबोधिनी प्रशाला (भोसला मिलिट्री स्कुल) विद्या परबोधिनी प्रशाला. (भोसला मिलिट्री स्कूल) च्या स्थापनेचं वर्ष 2005 आहे. ही शाळा संपूर्णतः मिलिट्री शाळा आहे. या शाळेत पहिल्या वर्गापासून तर दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येऊ शकतं. ही शाळा नाशिकमधील एक शिस्त आणि संस्कार प्रदान करणारी शाळा आहे. शाळेत ग्रंथालय, वर्ग आणि स्पोर्ट्ससाठी उत्तम व्यवस्था आहे. तसंच ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
विद्या प्रबोधिनी प्रशाला (भोसला मिलिट्री स्कुल)
विद्या प्रबोधिनी प्रशाला (भोसला मिलिट्री स्कुल) | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | वीर सावरकर नगर, नाशिक, महाराष्ट्र -422005 |
शाळेचा फोन क्रमांक | 0253-2309614 / 0253-2347855 |
शाळेचा ई-मेल आयडी | principalvppe@gmail.com |
वेबसाईट | http://vppe.bhonsala.in/ |
पालकांनो, मुलांच्या Admission चं टेन्शन विसरा; ‘या’ आहेत नागपुरातील टॉप 5 शाळा 2. केंद्रीय विद्यालय आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड ही एक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संलग्न आहे. शाळा ही एक कोड डे स्कूल आहे, ज्यामध्ये पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. शाळा नाशिक येथे आहे. केंद्रीय विद्यालय आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्पची स्थापना 1963 मध्ये करण्यात आली. ही एक सरकारी शाळा आहे आणि केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) चा एक भाग आहे आणि संरक्षण द्वारे व्यवस्थापित केली जाते.
केंद्रीय विद्यालय आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड
केंद्रीय विद्यालय आर्टिलरी सेंटर | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | वडनेर गेट, कारगिल गेट, वडनेर दुमाला - नाशिक, नाशिक - महाराष्ट्र, भारत -422102 |
शाळेचा फोन क्रमांक | 2532415429 |
शाळेचा ई-मेल आयडी | principalkvarnrc@yahoo.com |
वेबसाईट | www.kvnrc.com |
3. रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल ही एक वरिष्ठ माध्यमिक शाळा (XI-XII), केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), आंतरराष्ट्रीय पदवीधर (IB), केंब्रिज आंतरराष्ट्रीय परीक्षा (CIE) शी संलग्न आहे. नर्सरी ते बारावी पर्यंतचे वर्ग असलेली शाळा ही एक कोड डे स्कूल आहे. ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. नाशिकच्या अयोध्यानगरी भागात ही शाळा आहे. रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना 1994 मध्ये झाली. हे एक ट्रस्ट आहे आणि श्रीमान किसनलालजी सारडा प्रतिष्ठान द्वारे व्यवस्थापित केले जाते.
रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल
रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | वृंदावन, नाशिक- ओझर रोड - नाशिक - 422003 |
शाळेचा फोन क्रमांक | 0253 2304622 |
शाळेचा ई-मेल आयडी | internationalschool@rasbihari.org |
वेबसाईट | www.rasbihari.org/ |
Top Schools in MH: पालकांनो, मुलांसाठी ठाण्यात शाळा शोधताय? ‘या’ आहेत टॉप 5 शाळा
4. ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूल BVPS ही एक निवासी, सह-शैक्षणिक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे जी सुरक्षित, आश्वासक वातावरणात दर्जेदार शिक्षण देते आणि शिक्षणातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देते. ही महाराष्ट्र स्टेट बोर्डाची शाळा आहे. या शाळेत पहिल्या वर्गापासून तर दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येऊ शकतं. ही शाळा नाशिकमधील एक शिस्त आणि संस्कार प्रदान करणारी शाळा आहे. शाळेत ग्रंथालय, वर्ग आणि स्पोर्ट्ससाठी उत्तम व्यवस्था आहे. तसंच ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. यामध्ये जुनिअर कॉलेजसुद्धा आहे.
रह्मा व्हॅली पब्लिक स्कूल
ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूल | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | ब्रह्मा व्हॅली एज्युकेशनल कॅम्पस, अंजनेरी, (त्र्यंबकेश्वर), नाशिक, महाराष्ट्र 422213 |
शाळेचा फोन क्रमांक | (02594) 220142, 220208 / 9011957289 |
शाळेचा ई-मेल आयडी | principalbvps@yahoo.com |
वेबसाईट | http://www.bvps.brahmavalley.com/ |
5. अण्णा साहेब वैशंपायन विद्यालय नाशिक शहरातील अनेक विद्यार्थी या शाळेत शिकतात. महाराष्ट्र स्टेट बोर्डाची ही शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना चांगल्या सवयींपासून तर स्पोर्ट्स, म्युझिकपर्यंत शिक्षण देण्यात येतं. म्हणूनच ही ठाण्यातील शाळा टॉप शाळांमध्ये येते. विशेष म्हणजे या शाळेत स्पोर्ट्स गेम्स खेळण्यासाठी अनेक ग्राउंड्स आहेत.
अण्णा साहेब वैशंपायन विद्यालय | माहिती |
---|---|
शाळेचा पत्ता | रिंबक रोड, महात्मा नगर, नाशिक, महाराष्ट्र 422007 |
शाळेचा फोन क्रमांक | (0253) 2352184 |