Home /News /career /

Top Schools: पालकांनो, आता मुलांच्या Admissionsचं टेन्शन विसरा; 'या' आहेत नागपुरातील टॉप 5 शाळा

Top Schools: पालकांनो, आता मुलांच्या Admissionsचं टेन्शन विसरा; 'या' आहेत नागपुरातील टॉप 5 शाळा

नागपुरातील टॉप 5 शाळा

नागपुरातील टॉप 5 शाळा

आज आम्ही तुम्हाला नागपुरातील टॉप 5 शाळा (Top 5 schools in Nagpur List) आणि या शाळांबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पाल्यांना उत्तम शिक्षण घेण्यास मदत होईल.

  मुंबई, 27 फेब्रुवारी: फेब्रुवारी आणि मार्च महिना असल्यामुळे सध्या सर्व शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांचा घरात परीक्षेचे (School exams) वारे वाहू लागले आहेत परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या पाल्यांनी चांगल्या शाळेमध्ये प्रवेश (Admissions in best schools) घ्यावा किंवा चांगल्या शाळेत असतील तर पाल्यांनी उत्त्तरोत्तर प्रगती करावी अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. त्यात आता परिक्षानंतर पहिली आणि पाचवीच्या प्रवेशांचं (School admissions 2022) सत्र सुरु होणार आहे. आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत (Best schools in Maharashtra) प्रवेश मिळावा पालकांमध्ये अक्षरशः शर्यत लागली असते. RTE च्या अंतर्गत प्रवेश (How to get RTE Admissions) मिळवण्यासाठी कित्येक पालक तासंतास शाळांसमोर रांगेत उभे असतात. पण आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिक्षण घ्यावं अशी तुमचीही इच्छा असेल आणि तुम्ही चांगल्या शाळांच्या शोधात (How to get Admission in best school) असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला नागपुरातील टॉप 5 शाळा (Top 5 schools in Nagpur List) आणि या शाळांबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पाल्यांना उत्तम शिक्षण घेण्यास (Best educational schools in Nagpur) मदत होईल. चला तर जाणून घेऊया संपूर्ण लिस्ट (List of best schools in Nagpur).   1. सोमलवार हायस्कुल (Somalwar High School) सोमलवार हायस्कुल ही नागपुरातील टॉप आणि उत्तम शिक्षण देणारी शाळा आहे. दरवाराशी या शाळेतून दहावीत अनेक विद्यार्थी मेरिट येतात. शहरातील 15 शाळा चालवणाऱ्या सोमलवार अकादमीच्या अधिपत्याखाली ही शाळा स्थापन करण्यात आली आहे. या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. तसंच जुनिअर कॉलेजमध्येही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. सोमलवार शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या व्यतिरिक्त खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, कला आणि हस्तकला, नृत्य, संगीत, वक्तृत्वअशा प्रकारच्या काही कला सुद्धा शिकवण्यात येतात. या शाळेतील सर्व शिक्षण आणि शिक्षिका अतिशय अनुभवी आणि विद्यार्थ्यांना समजून घेणाऱ्या आहेत. जर तुम्हाला तुमच्या पाल्यांना उत्तम शिक्षण द्यायचं असेल तर सोमलवार ही शाळा अतिशय उत्तम आहे.
  सोमलवार हायस्कुलमाहिती 
  शाळेचा पत्ताराणप्रताप नगर रोड खामला, नागपूर-22
  शाळेचा फोन क्रमांक0712 2288912, 2023535
  शाळेचा ई-मेल आयडीsomalwaracademy@rediffmail.com
  2. सेंट्रल इंडिया पब्लिक स्कुल (Central India Public School) ही या शहरातीलच नाही तर देहातील काही उत्तम शिक्षण देणाऱ्या शाळांमधील एक शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांच्या उत्तम शिक्षणासह त्यांच्या वयक्तिक विकासावरही भर दिला जातो. ही शाळा CBSE बोर्डाच्या अंतर्गत येते. या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाव्यतिरिक्त ग्रंथालय, म्युझिक, स्पोर्ट्स आणि अशा अनेक सुविधा देण्यात येतात. शाळॆत शिस्त पाळण्यात येते त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शिस्त लागते.
  सेंट्रल इंडिया पब्लिक स्कुलमाहिती
  शाळेचा पत्ताबारादवारी तलावासमोर, कापसी (खुर्द), पारडी नाक्याजवळ, भंडारा रोड, नागपूर, महाराष्ट्र – 441104
  शाळेचा फोन क्रमांक0712-6529102
  शाळेचा ई-मेल आयडी cipsmanager274@gmail.com
  वेबसाईट www.cipsnagpur.edu.in
  3. NEERI मॉडर्न स्कुल (NEERI Modern school) NEERI म्हणजेच नॅशनल इन्व्हरमेंटल इंजीनिअरिंग रिसर्च इंस्टीट्यूट या अंतर्गत ही शाळा येते. तुमची जात, धर्म आणि इतर कोणत्याही गोष्टी न बघता तुम्हाला या शाळेत प्रवेश मिळू शकतो. ही शाळा CBSE बोर्डाची आहे. या शाळेत तब्बल तीनशे पुस्तकांचं मोठं ग्रंथालय आहे. तसंच शाळेत मोठं मैदान आणि स्पोर्ट्ससाठी वेगळी मैदानं आहेत. शाळेत कम्प्युटर लॅब्स आणि इतर मॉडर्न फॅसिलिटीज आहेत. शिक्षण आणि शिस्तीसाठी ही शाळा प्रसिद्ध आहे.
  NEERI मॉडर्न स्कुलमाहिती 
  शाळेचा पत्ताआरपीटीएस रोड, जेरील लॉन्स समोर, सुरेंद्र नगर,नागपूर - 440020
  शाळेचा फोन क्रमांक919370470966, 0712-2247769
  शाळेचा ई-मेल आयडीneerimodskool@gmail.com, admin@neerimodernschool.org
  वेबसाईट neerimodernschool.org
  4. केंद्रीय विद्यालय (Kendriya Vidyalaya School) केंद्रीय विद्यालय नागपूर ही शहरातील प्रमुख CBSE शाळांपैकी एक आहे. तसंच या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षांसोबतच इतर काही महत्त्वाचे गुणही शिकवण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येतो. तसंच या शाळेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अनेक पालक आणि विद्यार्थी प्रयत्न करतात. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश मिळतो. तसंच या शाळेमध्ये शिक्षणासोबतच स्पोर्ट्स, डान्स, म्युझिक आणि इतर कलाही शिकवण्यात येतात.
  केंद्रीय विद्यालयमाहिती 
  शाळेचा पत्ताऑर्डनन्स फॅक्टरी, अंबाझरी, नागपूर 440021
  शाळेचा फोन क्रमांक91-7104-222952, 237845
  शाळेचा ई-मेल आयडीambajharinagpurkv@gmail.com
  वेबसाईटhttps://kvambajhari.edu.in/
  5. पंडित बच्छराज व्यास विद्यालय (Pandit Bachharaj Vyas Vidyalaya) भारतीय शिक्षण मंडळांतर्गत ही शाळा येते. दक्षिण नागपुरातील काही मोठ्या आणि उत्तम शाळांपैकी ही एक आहे. या शाळेत शिक्षणसोबतच संस्कारांचे धडेही दिले जातात. कमी प्रवेश शुल्क पण अधिक शिक्षण या अंतर्गत या शाळेत शिक्षण देण्यात येत. या शाळेत विद्यार्थ्यांना स्पर्ट्स आणि इतर कलागुणही शिकावण्यात येतात. या शाळेत पहिले ते बारावीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.
  पंडित बच्छराज व्यास विद्यालय माहिती 
  शाळेचा पत्ताविवेकानंद स्कूल मेडिकल स्क्वेअरच्या बाजूला राजाबक्षा रोड, रामबाग, नागपूर, महाराष्ट्र 440003
  शाळेचा फोन क्रमांक (0712)-2740767 ·
  महत्त्वाची सूचना - शिक्षण घेण्यासाठी कुठलीही शाळा कमी नाही. वरील सर्व शाळा या टॉप म्हणून आमच्यातर्फे निवडण्यात आलेल्या नाहीत. सदर शाळांची प्रसिद्धी आणि त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता या शाळांची लिस्ट देण्यात आली आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Education, Nagpur News, School, School student, Top 5

  पुढील बातम्या