जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अवघे 15 सेकंद आणि कारमधील साडेतीन लाख रूपये लंपास; नाशकातील अजब चोरीचा VIDEO

अवघे 15 सेकंद आणि कारमधील साडेतीन लाख रूपये लंपास; नाशकातील अजब चोरीचा VIDEO

अवघे 15 सेकंद आणि कारमधील साडेतीन लाख रूपये लंपास; नाशकातील अजब चोरीचा VIDEO

रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या कारची काच तोडून चोरट्याने साडेतीन लाख रुपये लंपास केले. लासलगावच्या कोटमगाव येथे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

बब्बू शेख, मनमाड 21 ऑक्टोबर : अनेकदा आपण बाहेर कुठे फिरायला किंवा कामानिमित्त गेलो की रस्त्याच्या कडेला गाडी उभा करतो. आपल्या चारचाकीमधील वस्तू अतिशय सुरक्षित आहेत आणि गाडी लॉक असताना कोणीही त्याला हात लावू शकत नाही, असा अनेकांचा समज असतो. मात्र, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. याचाच प्रत्यय देणारी एक घटना लासलगावमधून समोर आली आहे. घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘घरात’ गँगवारचा भडका, ठाण्यात 2 तासात 2 गोळीबार दिवसाढवळ्या कारमधून रक्कम लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना लासलगावच्या कोटमगाव येथे घडली आहे. यात रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या कारची काच तोडून चोरट्याने साडेतीन लाख रुपये लंपास केले. लासलगावच्या कोटमगाव येथे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात

एका व्यापाऱ्याने बँकेतून काढलेले साडेतीन लाख रुपये पिशवीत ठेवले होते. ही पिशवी त्याने कारमध्येच ठेवली. कार रस्त्याच्या कडेला उभी करून हा व्यापारी मार्केटमध्ये गेला असता त्याच्यावर पाळत ठेवणाऱ्या चोरट्याने ही संधी साधत साधली. चोरट्याने कारची काच तोडून रक्कम ठेवलेली पिशवी घेतली आणि तिथून पसार झाला. चोरट्यांनी ग्राहकाचाच केला ‘पोपट’, पुण्यातील तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यामध्ये हा चोर आजूबाजूच्या लोकांना संशय येऊ नये यासाठी अगदी सहज या कारजवळ जाऊन उभा राहातो आणि अवघ्या १५ सेकंदाच्या आत तो कारची काच तोडून आतमधील पैसे लंपास करतो. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: nashik , theft
  • First Published :
जाहिरात
जाहिरात