मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : धक्कादायक! शहरात तब्बल 6 हजार 270 खड्डे; आयुक्तांच्या कबुलीनं पालिकेची पोलखोल

Nashik : धक्कादायक! शहरात तब्बल 6 हजार 270 खड्डे; आयुक्तांच्या कबुलीनं पालिकेची पोलखोल

रस्त्यावर खड्डे

रस्त्यावर खड्डे

नाशिक शहरात तब्बल 6 हजार 270 इतके खड्डे असल्याचं सर्व्हे मध्ये समोर आले आहे. त्यामुळे नागरिक प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक 20 जुलै ; स्मार्ट सिटीचा ( smart city) टेंभा मिरवणाऱ्या नाशिक शहरातले रस्ते खड्डेमय झालेत. (Roads in Nashik city area potholes) शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी अवस्था निर्माण झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. अशातच शहरात तब्बल 6 हजार 270 इतके खड्डे असल्याचं सर्व्हे मध्ये समोर आले आहे. त्यामुळे नागरिक प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त करत आहेत.

महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनीच शहरातील खड्ड्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये शहरात तब्बल 6 हजार 270 इतके खड्डे असल्याचं सर्व्हे मध्ये समोर आले आहे. दरवर्षी शहरातील खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढले जातात. कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मात्र, परिस्थिती जैसे थे च असतेतात्पुरती डागडुजी करून रस्ते चांगले असल्याचं ठेकेदारांकडून भासवलं जातं आणि त्यानंतर पुन्हा नाशिककरांवर खड्ड्यांचा सामना करण्याची वेळ येते. त्यामुळे प्रशासनाने वेळीच या खड्ड्यांकडे लक्ष देऊन रस्त्यांची डागडुजी करावी आणि रस्ते खड्डेमुक्त करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 हेही वाचा - Akola : पावसामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे, जीव मुठीत धरून चालवावी लागतायत वाहनं, VIDEO

शहरात या ठिकाणी खड्डेच खड्डे

शहरातील सातपूर, सिडको, अंबड, पाथर्डीफाटा, पंचवटी, गंगापूर रोड, निमानी, सीबीएस, द्वारका, म्हसरूळ या परिसरात अधिक खड्डे आहेत. त्यामुळे या खड्ड्यांचा नाहक त्रास नागरिकांना प्रवास करताना होत आहे.

दरवर्षी भोगावा लागतो त्रास 

"रस्त्यांचा त्रास आम्हाला दरवर्षी भोगावा लागतो. जणू आमच्या पाचवीलाच हा त्रास पुजला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच खड्ड्यांवर उपाययोजना करावी", अशी मागणी स्थानिक नागरिक दत्तू बोडके यांनी केली आहे. त्यासोबतच स्थानिक नागरिक लखन कुमावत म्हणाले की, "दरवर्षी लाखो करोडो रुपये रस्त्यांवर खर्च केले जातात. तरीही रस्ते चांगले होत नाहीत. प्रशासकीय अधिकारी ठेकेदारांच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यांच्याकडून पैसे मिळाले की अधिकारी गप्प बसतात. कुठलीच कारवाई करत नाहीत. जर ठेकेदार चांगल काम करत नसतील तर त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही ? त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. मात्र, हे जर थांबलं नाही. तर आम्ही नाशिककर या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन करू".

हेही वाचा - Osmanabad : गाव खेड्यातील कलाकार अन् मोबाईलवर शूटींग; वेब सीरिजची YouTube वर धूम

खड्डे बुजवण्याचे काम चालू

"शहरात रस्त्यांवर 6 हजार 270 इतके खड्डे पडले आहेत. ते बुजवण्या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यातील बरेच खड्डे बुजवले आहेत. काही खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे. मी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. सर्व खड्डे व्यवस्थित बुजवले गेले पाहिजे. व्यवस्थित खड्डे बुजवा,अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल".अशी माहिती महानगरपालिका आयुक्त रमेश पवार दिली आहे.

First published:

Tags: Nashik, Problems