जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Akola : पावसामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे, जीव मुठीत धरून चालवावी लागतायत वाहनं, VIDEO

Akola : पावसामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे, जीव मुठीत धरून चालवावी लागतायत वाहनं, VIDEO

पावसामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे

पावसामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे

खड्ड्यामुळे वाहनधारकांना, पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी भरत असल्याने खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

  • -MIN READ Akola,Akola,Maharashtra
  • Last Updated :

    अकोला, 20, जुलै : शहरातील अनेक मोठ्या रस्त्यांचे नूतनीकरण झाले आहे. मात्र, नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांवर हळूहळू खड्डे पडत आहेत. काही सिमेंटचे रस्तेही खचू लागले आहेत. यासोबतच अनेक जुन्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे (potholes on roads) पडले असून, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जीव मुठीत धरून नागरिक खड्डेमय रस्त्यातून प्रवास करीत आहेत. (potholes on roads due to rain in akola) गेल्या पंधरा दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अकोला शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे प्रवास करणे कठीण झाले आहे. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे लक्षच नसल्याचे येथील नागरिक सांगतात. खड्ड्यामुळे वाहनधारकांना, पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी भरत असल्याने खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शाळा, ट्यूशन सुरू असल्याने विद्यार्थ्यांची देखील वर्दळ या रस्त्यावरून असते. येथील खड्ड्यांवर काही अपघात देखील झाल्याचे नागरिक सांगतात. प्रशासनाने वेळीच या खड्ड्यांकडे लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करावी आणि रस्ता खड्डेमुक्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. हेही वाचा- Osmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्यादेखत कोवळी पिके फस्त शहर खड्डे मुक्त करावं अकोला शहर अर्ध्यापेक्षा जास्त खड्डेमय झालेला आहे. खड्ड्यांवर कुठलीच उपाययोजना करण्यात येत नाही. खड्ड्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होतो शिवाय अपघाताचीही भिती असते. शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा या खड्ड्यांचा सामना करून शाळेत पोहोचावे लागते. प्रशासनाने वेळीच खड्ड्यांवर उपाययोजना करावी अकोला शहर खड्डे मुक्त करावं, अशी मागणी अकोला शहरातील नागरिक अतुल काळणे यांनी केली आहे. हेही वाचा- Beed : दिल्लीच्या कार्यक्रमात सादर होणार अस्सल लावणी; बीडची ‘ही’ तरुणी करणार सादरीकरण, VIDEO कुठल्या रस्त्यावर खड्डे? अकोला शहरातील टावर ते रतनलाल प्लॉट, दुर्गा चौक ते अग्रसेन चौकच्या रोडवरील लेडींग हॉस्पिटल समोर, सातव चौक ते हेडगेवार रक्तपेढी जवळ, राऊतवाडी चौक उमरी रोड वरील फुलपाखरू शाळे जवळ रस्त्यांवर अनेक खड्डे आहेत.    पावसामुळे रस्ता दुरुस्तीचे कामे करता येत नाहीत अकोला शहरात मोठ्या प्रमाणाचे सिमेंट रोडचे काम चालू आहे. जोरदार पाऊस सुरू असल्याने रोडवर खड्डे पडत आहेत. पावसामुळे रस्ता दुरुस्तीचे कामे करता येत नाहीत. खड्ड्याच्या ठिकाणी आपण मुरूम, गिट्टी वगैरे टाकून खड्डे बुजवले जात आहेत. पण पावसामुळे आणि मोठ्या वाहनांमुळे खड्ड्यातील मुरूम निघून जात आहे. पोलिसांची सर्व रोडवर पेट्रोलिंग चालू असते. संबंधित ठेकेदाराला देखील रस्त्याबाबत कळवले आहे. खड्ड्यामुळे कुठेही ट्रॅफिक जाम होणार नाही याकडे आमची यंत्रणा लक्ष ठेवून आहे, अशी माहिती शहरातील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली.  

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात