जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Osmanabad : गाव खेड्यातील कलाकार अन् मोबाईलवर शूटींग; वेब सीरिजची YouTube वर धूम

Osmanabad : गाव खेड्यातील कलाकार अन् मोबाईलवर शूटींग; वेब सीरिजची YouTube वर धूम

"तेरणा काठची पोर"  वेब सीरिज

"तेरणा काठची पोर" वेब सीरिज

येत्या काळात सोशल मीडिया म्हणजेच सर्व काही हे विचारात घेऊन योगीराज पांचाळ (Yogiraj Panchal) यांनी स्वत: दिग्दर्शित “तेरणा काठची पोर” (Terna Kathchi Por) या वेब सिरीजची निर्मिती केली आहे.

  • -MIN READ Osmanabad,Osmanabad,Maharashtra
  • Last Updated :

    उस्मानाबाद, 20 जुलै : ग्रामीण भागात नटखट व्यक्तिरेखा असतात. अभिनयाची आवड असूनही वाव मिळत नसलेल्या गावखेड्यातील कलाकारांसाठी वेब सिरीज हा चांगला प्लॅटफॉर्म बनत चालला आहे. आज सोशल मीडियाचा (Social media) काळ आहे. जगभरातील बऱ्याच लोकांकडे मोबाईल आहेत. कोणी याचा उपयोग करून कौटुंबिक, व्यावसायिक सहकाऱ्यांशी संपर्क साधतो तर कोणी मनोरंजनासाठी याचा उपयोग करत असतो. येत्या काळात सोशल मीडिया म्हणजेच सर्व काही हे विचारात घेऊन योगीराज पांचाळ (Yogiraj Panchal) यांनी स्वत: दिग्दर्शित “तेरणा काठची पोर” (Terna Kathchi Por) या वेब सिरीजची निर्मिती केली आहे. योगीराज यांची ही वेब सीरिज युट्यूब वरती प्रदर्शित झाली आहे. गावखेड्यात भिन्न भिन्न प्रकारची मंडळी असते. त्यात पुढारी, दारुडे, शिक्षित आणि अडाणी या सर्व पात्रांचे बारकाईने निरीक्षण करून योगीराज पांचाळ यांनी एका वेब सिरीजचे लिखाण केले. त्यांनी वेब सिरीजचे नाव ठेवले “तेरणा काठची पोरं”. या वेब सीरिजसाठी कलाकार मंडळीची निवड त्यांच्याच गावामधून केली. त्यांना हवी तशी पात्रे दहिफळ गावातच मिळाली. त्यांच्या सोबत वयस्कर पासून ते लहानापर्यंत सर्व कलाकार आवडीने काम करतात. दहिफळ या गावाला कलाकृतींचा वारसा लाभलेला. अनेक गावकरी मंडळी गावामध्ये होणाऱ्या उपक्रमात एकपात्री नाट्य असो किंवा सामूहिक नाट्यांचे सादरीकरण करायचे. अशा कलाकारांची कला ओळखून सोशल मिडीयाच्या काळात कलाकारांच्या कलेला न्याय देत, त्यांच्यासाठी योगीराज नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत. हेही वाचा- Osmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्यादेखत कोवळी पिके फस्त तेरणा काठची पोरं या वेब सीरिजला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या वेब सिरीजच्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते. योगीराज हे व्यवसायाने पत्रकार आहेत. गावात सतत काही तरी बदल घडवून आणण्यासाठी त्यांची धडपड असते. आपल्याच गावात असे अनेक कलाकार आहेत ज्यांना योग्य प्लॅटफॉर्म न मिळाल्याने त्यांची कला विस्मरण होत गेली. अंगात असलेली कला सादर होत नसल्याने अशा गुणीजणांच्या अंगातील कला नेहमी सळसळ करत असते. गावठी तमाशा ते टॉकीज आणि नाटक ते नाटक असा मनोरंजनाच्या दुनियेचा प्रवास पाहिलेल्या दोन पिढ्यांनाही काही वेगळा अनुभव आलेला नाही. परंतु, मागच्या काही वर्षात हा प्रवास स्मार्ट होत प्रत्येकाच्या तळहातावर आला आहे. ही प्रगती ग्रामीण भागातील कलाकारांसाठी सुवर्णसंधी ठरत आहे. शूटींगसाठी कॅमेरा नव्हता तेरणा काठची पोरं या वेब सिरीजची निर्मिती करण्याचे योगीराज यांनी ठरविले. मात्र शूटींग करण्यासाठी त्यांच्याकडे कॅमेरा देखील नव्हता, होती ती फक्त जिद्द. जिद्दीच्या आणि हिमतीच्या जोरावर योगीराज यांनी सर्व शूटींग मोबाईलवर करण्याचे ठरविले. आज जवळपास ७० भागांची शूटींग मोबाईलवर त्यांनी यशस्वीरीत्या त्यांनी पूर्ण करून दाखविली आहे. पुढील येत्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी हिंदी भाषेत नवीन वेब सिरीजची निर्मिती योगीराज करणार आहेत. हेही वाचा- Beed : दिल्लीच्या कार्यक्रमात सादर होणार अस्सल लावणी; बीडची ‘ही’ तरुणी करणार सादरीकरण, VIDEO मनात फक्त जिद्द होती सोशल मीडियाच्या काळात भरपूर गोष्टी व्हायरल होतात. गावरान भाषेतील कलाकृती प्रेक्षकांना आज मोबाईलवर पहायला आवडते. मी ठरविले की आपणही अशी वेब सिरीज करू शकतो. सुरूवातीला वेब सिरीजचे लिखाण केले आणि कलाकार कुठून आणावे, असा प्रश्न मला पडला. कारण सुरुवातीच्या काळात कलाकारांना मानधन देण्याएवढी परिस्थिती नव्हती. मग गावातील काही जुन्या कलाकारांच्या भेटी घेतल्या. त्यांना सर्व मनातील  कल्पना सांगितली. सगळे कलाकार स्वत:च्या आवडीने काम करायचे म्हणले. पण आणखी एक अडचण अशी होती की, आमच्याकडे शूटींगसाठी कॅमेरा नव्हता. मग आपण मोबाईलवर शूटींग करू असे सर्व कलाकारांना मी म्हटलो. सर्वांनी यासाठी होकार दिला, आम्ही प्रेक्षकांच्या आवडीचे विषय घेऊन भाग बनविले त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रेक्षकांच्या साथीमुळे आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते, असे निर्माते योगीराज पांचाळ यांनी सांगितले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात