नाशिक, 01 जानेवारी : नाशिकच्या इगतपुरी मुंडे गावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. कंपनीमध्ये 20 हजार डिझेल क्षमता असलेली टाकी आहे. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. कंपनीमध्ये अजूनही 25 ते 30 कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी मुंडे गावजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत आज सकाळी स्फोट झाला. पॉलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या जिंदाल ग्रुपच्या या कंपनीत आधी स्फोट झाला आणि या स्फोटामुळे आग लागली. बायलरचा भीषण स्फोट झाला. या आगीमध्ये काही कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर काही कर्मचारी हे आता अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीचे लोण दूरवर दिसत होते. तर नाशिक ग्रामीण अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. ( वर्षाच्या पहिल्यााच दिवशी गुंडांचा उच्छाद, गाड्यांची तोडफोड, पुण्यात चाललंय काय? ) कंपनीत 25 ते 30 कामगार, कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 3 गंभीर जखमी कामगारांना, रेस्क्यू टीमनं बाहेर काढलं आहे. नाशिकच्या, जिल्हा सामान्य रुग्णालयात 50 बेडचा आणि इगतपुरीच्या SMBT मेडिकल कॉलेजमध्ये विशेष कक्ष तयार केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह, सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल आहे. आगीची भीषणता अजूनही दाहक आहे. (Jalgaon Accident : लहान मुलीची भेट झालीच नाही, वाटेतच बापासोबत वाईट घडलं, मोठ्या लेकीनं डोळ्यानं पाहिलं!) महिंद्र आणि महिंद्रा कंपनी, घोटी टोल नाका, इगतपुरी,त्रंबकेश्वर, सिन्नर आणि नाशिक येथून अग्निशमन दल आणि पंप घटनास्थळी दाखल आहे. आग अजूनही आटोक्यात नसल्याने बचावकार्यात मोठे अडथळे येत आहे. घटनास्थळी 7 रुग्णवाहिका दाखल आहे. बचावकार्यात मोठ्या अडचणी आग लागलेल्या शाफ्ट जवळ अवघ्या 150 मीटर अंतरावर मोठी इंधन टॅंक आहे. या मोठ्या टाकीत, जवळपास 20 हजार डिझेल असल्याची माहिती समोर आली आहे. जिंदाल कंपनीतील डिझास्टर यंत्रणा माहिती असलेला एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील आपत्कालीन यंत्रणेचा, माहिती नसल्यानं अद्याप कोणताही उपयोग झाला नाही. प्रचंड धूर झाल्यानं, बचावकार्यात प्रशासनाला अनेक अडचणी येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.