Home /News /maharashtra /

Nashik Ramsetu : ऐतिहासिक 'रामसेतू'वरून नाशिकमध्ये 'महाभारत', नागरिक आणि प्रशासनमध्ये संघर्षाची ठिणगी

Nashik Ramsetu : ऐतिहासिक 'रामसेतू'वरून नाशिकमध्ये 'महाभारत', नागरिक आणि प्रशासनमध्ये संघर्षाची ठिणगी

रामसेतू पूल

रामसेतू पूल

चार महापुरांचा साक्षीदार असलेला गोदावरी वरील ऐतिहासिक रामसेतू पुलावरून (Nashik Ram setu Bridge) नाशिकमध्ये महाभारत रंगले आहे.

  नाशिक 22 जुलै ; गोदावरी नदीवर ऐतिहासिक रामसेतू पूल हा पंचवटी आणि नाशिक शहराला जोडणारा मोठा दुवा आहे. नाशिक (Nashik) मधील चार महापुरांचा साक्षीदार असलेला गोदावरी वरील ऐतिहासिक रामसेतू पूल (Historic Ram Setu Bridge) आज शेवटच्या घटका मोजतोय. गोदावरीला आलेल्या पुरामुळे पाण्याचा तडाका बसल्याने रामसेतू पुलाला तडे गेले आहेत. तो जाण्या -येण्यासाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हा पूल पाडण्याच्या हालचाली दिसत असताना, नाशिककरांनी पुल पाडण्याला प्रचंड विरोध दर्शवला आहे. रामसेतू हा ऐतिहासिक पुल आहे. 1955 सालापासून तर आजतागायत या पुलाणे नाशिकरांना जोडून ठेवलं आहे. 1969, 2008, 2016, 2019 च्या महापुरांचा साक्षीदार हा पूल आहे. नाशिक-पंचवटीला जोडणारा हा नागरिकांचा हक्काचा पुल आहे. या पुलामुळे इथली वाहतूक सुरळीत सुरू आहे. जर हा पूल नसला तर नागरिकांना गोदावरी नदीला वळसा घालून जावं लागेल. त्यामुळे इथे पूल असणे ही स्थानिकांची गरज आहे.

  हेही वाचा- Aurangabad: मुख्य चौकातीलच सिग्नल बंद; शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही रोज वाटतेय जीवाची भीती!

  काय म्हणतात स्थानिक नागरिक  रामसेतू पूल हा ऐतिहासिक पूल आहे. हा नाशिकची ओळख आहे. त्यामुळे हा पूल न पाडता प्रशासनाणे त्याची डागडुजी करायला हवी. त्याला आधार द्यायला हवा. मात्र, त्यावर हातोडा चालू नये. नाशिक शहरात स्मार्ट सिटीच काम आधीच खूप धिम्म्या गतीने सुरू आहे. अनेक रस्ते शहरात खोदून ठेवले आहेत. तेच अद्याप पूर्ण नाही तर हा पूल जर पाडला तर त्याला कित्येक वर्षे जातील तरीही पूर्ण होणार नाही. नागरिकांचे जाण्या-येण्याचे हाल होतील. त्यामुळे हा पूल प्रशासनाने पाडू नये, अशी मागणी नागरिक दिपक चव्हाण यांनी केली. रामसेतू पुलाची आहे त्याच स्थितीत डागडूजी करून प्रशासनाने सुशोभिकरण करावं इतिहास जपला पाहिजे. नाशिकची ओळख ही इतिहास कालीन वास्तूनी जपली आहे. त्याच संवर्धन व्हायला हवं. त्यामुळे हा पूल प्रशासनाने पाडू नये, अशी मागणी नागरिक विलास जोशी यांनी केली. काय आहे पुलाच्या नावाचा इतिहास? नाशिक शहर हे धार्मिक शहर आहे. प्रभू रामचंद्रांनी वनवास काळात याच पंचवटी परिसरात वास्तव्य केलं होत. त्यावरूनच या पुलाला 'रामसेतू'  असे नाव देण्यात आल्याची माहिती आहे. हेही वाचा- Aurangabad : पावसाळ्यात वाढतोय Fungal Infection चा धोका; आजार टाळण्यासाठी 'ही' घ्या काळजी रामसेतू वाचवण्यासाठी 'रामसेतू' बचाव अभियान हा ऐतिहासिक रामसेतू पुल वाचवण्यासाठी नाशिककरांनी एकत्रित येत "रामसेतू ' बचाव अभियान सुरू केले आहे. कल्पना पांडे या बचाव अभियानाच्या अध्यक्षा आहेत. कल्पना पांडे म्हणाल्या की, गोदावरी नदीवरील रामसेतू पुलाची ओळख जुनी आहे. पूर्वी पंचवटीतून नाशिकमध्ये छोट्या-मोठ्या कामांसाठी पादचारी मार्ग म्हणून रामसेतू पूल हा एकमेव होता. अनेक पूर या रामसेतूने झेलले आहेत. तरीसुद्धा तो आज ताठ मानेने उभा आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिकच्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी होत आहे. नारोशंकराच्या जवळील दोन सांडवे स्थानिक नागरिकांना विचारात न घेता तोडले गेले. आता पादचाऱ्यांसाठी रामसेतू पूल हा एकमेव पर्याय असताना त्याला पाडण्याचा घाट घातला जात आहे. स्मार्ट सिटीचा पैसा खर्च करायचा असेल तर रामसेतू पुलाची डागडुजी करा, पूल सुशोभित करा परंतु तोडण्याची भाषा करू नका. त्या पुलावर नवीन स्लॅप टाकण्याची गरज आहे. पुलाचे पिलर मजबूत आहेत. गोदाघाट रामसेतू पूल व राम घाटावरील मंदिरे हे आधीपासून आहेत. तेव्हा त्यांना न पाडता दुरुस्ती करून सुशोभीकरण करावेत. रामसेतू पूल पाडणे हा उद्देश नाही शहरासाठी सोईयुक्त बांधकाम व सुशोभीकरण करणे हा स्मार्ट सिटीचा उद्देश आहे. रामसेतू पूल पाडणे हा उद्देश नाही. पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पत्रव्यवहार केलेला आहे. आठ दिवसात त्याचा रिपोर्ट येईल. त्यानंतर रामसेतू पुलाची दुरुस्ती करायची ? की पाडायचा हा निर्णय समिती घेईल. सद्य स्थितीत रामसेतू पूल सुरक्षेच्या दृष्टीने जाण्या-येण्यासाठी बंद करण्यात आला आहे. वाहन चालकांना आवाहन करण्यात आले आहे की कोणी ही पुलावरून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये. सद्या गोदावरीला पूर आहे, अशी माहिती स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिली.
  First published:

  Tags: Nashik, Rain flood

  पुढील बातम्या