मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Aurangabad: मुख्य चौकातीलच सिग्नल बंद; शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही रोज वाटतेय जीवाची भीती!

Aurangabad: मुख्य चौकातीलच सिग्नल बंद; शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही रोज वाटतेय जीवाची भीती!

X
सिग्नल

सिग्नल बंद

अहिल्याबाई होळकर चौकामध्ये ( Ahilyabai Holkar Chowk Aurangabad ) सिग्नल बंद ( Signal Off ) असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ( Traffic congestion ) नित्याची बाब झाली आहे. पादचाऱ्यांसह वाहनचालकांना रस्ता ओलांडताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

पुढे वाचा ...

    औरंगाबाद, 22 जुलै : शहरातील मुख्य चौकांपैकी एक असलेला अहिल्याबाई होळकर चौकामध्ये ( Ahilyabai Holkar Chowk Aurangabad ) सिग्नल बंद ( Signal Off ) असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ( Traffic congestion ) नित्याची बाब झाली आहे. पादचाऱ्यांसह वाहनचालकांना रस्ता ओलांडताना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. छोटे-मोठे अपघात दिवसाला या ठिकाणी घडत असतात. यामुळे या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला सिग्नल सुरू करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला केली आहे.

    शहरात दिवसेंदिवस दळणवळणाच्या सुविधा वाढत आहेत. सर्वसामान्य नागरिक सार्वजनिक वाहतुकी शिवाय खाजगी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात भर देत आहेत. यामुळे शहरांमध्ये दिवसाला वाहनांची संख्या वाढत चालली आहे. परिणामी रस्त्यावर देखील वाहनांची गर्दी होत आहे. शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी सिग्नलची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, शहरातील मुख्य चौकांपैकी एक असलेला अहिल्याबाई होळकर चौकामध्ये सात रस्ते येऊन जुळतात. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र, येथील गेल्या काही वर्षांपासून सिग्नल बंद असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्याचबरोबर छोटे-मोठे अपघात होत असतात.

    हेही वाचा- Nashik: जमिनीवर सरपटत पूर्ण केली सप्तपदी, दिव्यांग जोडप्याच्या लग्नाची गोष्ट वाचून डोळ्यात येईल पाणी

    अहिल्याबाई होळकर चौकापासून काही अंतरावरती महाविद्यालय त्यासोबत शाळा आहे. या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. लहान मुलांना शाळा सुटल्यानंतर रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागते. बऱ्याचदा अपघात देखील होतात. यामुळे लहान मुलांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

    या आहेत समस्या

    या ठिकाणी बऱ्याचदा वाहतूक कोंडी होत असते. शाळा सुटल्यानंतर लहान मुलांना रस्ता ओलांडताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.  दिवसाला तीन ते चार छोटे-मोठे अपघात होतात. सर्वसामान्य नागरिकांना पायी जाताना रस्ता ओलांडता येत नाही. इत्यादी अडचणी या ठिकाणी येत असतात.

    हेही वाचा- Aurangabad : पावसाळ्यात वाढतोय Fungal Infection चा धोका; आजार टाळण्यासाठी 'ही' घ्या काळजी

    लवकर सिग्नल सुरु करण्यात यावा 

    अहिल्याबाई होळकर चौक हा महत्त्वाचा चौक आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. शाळा महाविद्यालय त्यासोबतच रहदारी जास्त असल्याने या ठिकाणी अपघात होत असतात. यामुळे या ठिकाणी बंद असलेला सिग्नल सुरू करण्यात यावा, अशी मागणी औरंगाबाद शहरातील नागरिक सागर वाघचौरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

    लवकरच पर्याय काढू

    अहिल्याबाई होळकर चौक हा इतर चौकांच्या तुलनेत मोठा चौक आहे. यामुळे या ठिकाणी नियमित वापरात असलेले सिग्नल पुरेसे नाहीत. यामुळे हा सिग्नल तात्पुरता बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी सिग्नल सुरू करण्यासंदर्भात महापालिकेशी चर्चा करून लवकरच याच्यावर पर्याय काढण्यात येणार आहे, अशी माहिती शहरातील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय बहुरे यांनी दिली.

    First published:

    Tags: Aurangabad, Aurangabad News, Traffic signal