जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : पावसाळ्यात वाढतोय Fungal Infection चा धोका; आजार टाळण्यासाठी 'ही' घ्या काळजी

Aurangabad : पावसाळ्यात वाढतोय Fungal Infection चा धोका; आजार टाळण्यासाठी 'ही' घ्या काळजी

फंगल इन्फेक्शन

फंगल इन्फेक्शन

पावसाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) हा संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. हा आजार झाल्यानंतर घरी उपचार करू नये. त्वचारोग तज्ञांकडे जाऊन यासंबंधीचा उपचार सुरू करावा यावर तात्काळ नियंत्रण मिळवता येते.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Bihar
  • Last Updated :

    औरंगाबाद, 21 जुलै : पावसाळ्यामध्ये भिजल्यानंतर कपडे ओले होतात. बऱ्याचदा पावसात भिजून आल्यानंतर ओले कपडे तसेच ठेवले जातात. त्यासोबतच पावसाळ्यामध्ये कपडे वाळत नसल्यामुळे ओले कपडे घालण्याचे प्रमाण वाढते. यामुळे फंगल इन्फेक्शन ( Fungal Infection ) हा संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. औरंगाबाद शहरामध्ये सध्या याच फंगल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे नागरिकांनी त्वचारोग ( Dermatitis ) तज्ञांचा सल्ला घेऊन यावर तात्काळ उपचार करावा, असे आवाहन घाटी रुग्णालयाच्या त्वचारोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुधीर मेढेकर यांनी केले आहे. पावसाळा सुरू झाला की बऱ्याचदा नागरिकांना कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर पावसात भिजावे लागते. यामुळे कपडे ओले होतात. नागरिक ओले कपडे घालून दिवस काढतात. मात्र, यामुळे फंगल इन्फेक्शन आजार होत असतो आणि या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. घाटी रुग्णालयात येणाऱ्या 10 रुग्णांमध्ये 3 ते 4 रुग्ण आढळतात, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या त्वचारोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली आहे.

    हेही वाचा-  Akola : स्वादिष्ट कुरकुरीत पालक भजी अन् हिरवी चटणी, बघूनच सुटेल तोंडाला पाणी

    आजार झाल्यास अशी घ्या काळजी  या आजारावर नागरिकांनी घरच्या घरी उपचार करू नये किंवा कुठला जडीबुटीचा वापर करू नये. यामुळे दुसरे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते किंवा हा आजार नागरिकांनी अंगावर काढू नये. हा आजार अंगावर काढल्यामुळे तो घरातील सदस्य किंवा सोबत राहणाऱ्या व्यक्तीला देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ त्वचारोग तज्ञांकडे जाऊन यासंबंधीचा उपचार सुरू करावा यावर तात्काळ नियंत्रण मिळवता येते. पावसाळ्यात हे टाळावे नागरिकांनी ओले कपडे घालू नये. अंतर्वस्त्र सुकलेलेच वापरावे किंवा शिल्लक वापरावेत. टॉवेल देखील कोरडा करूनच वापरावा. मित्रांची चप्पल सॉक्स बूट वापरू नये. दुसऱ्यांचा कंगवा वापरू नये. इत्यादी काळजी घेतल्यास हा आजार पसरण्यापासून रोखता येऊ शकते. हेही वाचा-  Akola : अतिवृष्टी, वाणी किडी, अन् वन्यप्राण्यांमुळे पिके उद्ध्वस्त; ‘‘आता व्याजाचे पैसे फेडायचे कसे?’’ तात्काळ घ्यावे उपचार नागरिकांना हा आजार होत असताना देखील नागरिक याकडे दुर्लक्ष करतात यामुळे हा आजार इतर व्यक्तींना देखील होत आहे. घाटी रुग्णालयातील ओपीडी मध्ये त्वचारोग विभागात यावर उपचार केले जातात. नागरिकांनी या आजाराला अंगावर न काढता तात्काळ यावर उपचार करावा असे, आवाहन त्वचा रोग तज्ञ डॉ. सुधीर मेढेकर यांनी केले.

                                                                                                         गुगल मॅप वरून साभार …

    जाहिरात

    घाटी रुग्णालयात जाण्यासाठी पत्ता  घाटी रुग्णालय, पीईएस इंजिनीअरिंग कॉलेज रोड, समोर पाणचक्की रोड, औरंगाबाद, महाराष्ट्र 431001 या पत्त्यावर रुग्णालयात जाऊ शकता. रुग्णालयाची वेळ ही सकाळी 10 ते दुपारी 1 आहे.  फंगल इन्फेक्शन उपाचारासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी घाटी रुग्णालयाच्या 0240 240 2412 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात