जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Manas Pagar : निवडणुकीचा निकाल सुरू असताना सुधीर तांबे स्मशानभूमीत, सत्यजितपेक्षाही....

Manas Pagar : निवडणुकीचा निकाल सुरू असताना सुधीर तांबे स्मशानभूमीत, सत्यजितपेक्षाही....

Manas Pagar : निवडणुकीचा निकाल सुरू असताना सुधीर तांबे स्मशानभूमीत, सत्यजितपेक्षाही....

सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तील असलेले नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार नाशिकमध्ये जात असतानाच त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 02 फेब्रुवारी : मागच्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत राज्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान नाशिक पदवीधर विधानपरिषदेचा आज निकाल लागणार आहे. या दरम्यान सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तील असलेले नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार नाशिकमध्ये जात असतानाच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यामुळे सत्यजीत तांबेंना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

मानस पगार हे काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांचे अत्यंत जवळचे सहकारी समजले जातात. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी ही दु:खद बातमी येऊन धडकल्याने धक्का बसल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. सत्यजित तांबे यांनी स्वतः ट्विट करत आपल्या जवळच्या सहकाऱ्यांला श्रद्धांजली व्यक्त केली आहे. मानस पगार यांच्या पार्थिवावर आज पिंपळगाव बसवंत या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जाहिरात

दरम्यान मानस पगार हे तांबे कुटुंबियांच्या जवळचे असल्याने तांबे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.  यामुळे सत्यजीत तांबे यांचे वडील मतमोजणीच्या ठिकाणी न जाता ते अत्यसंस्कार करण्यासाठी हजर झाले आहेत.

राजकारणातील तरुण चेहरा म्हणून मानस पगार यांना ओळखले जात होते. मानस पगार हे नाशिक जिल्ह्यातील लोकप्रिय तरुण नेते होते. अचानक झालेल्या अपघातामुळे पगार यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मानस पगार यांच्या निधनामुळे एका उमद्या आणि तरुण नेत्याला मुकल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

बुधवारी रात्री अपघात झाल्यानंतर मानस पगार यांना तातडीने नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातात मानस पगार यांचे काही सहकारीही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बुधवारी रात्री उशिरा नाशिक-मुंबई महामार्गावरील कन्नमवार पुलाजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की यात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. कारची पुढील बाजुचा पूर्णपणे चुराडा झाल्याने मानस पगार यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हे ही वाचा :  कोकण मतदारसंघात भाजपने खातं उघडलं; मविआला धक्का; नाना पटोले म्हणतात ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

जाहिरात

मानस पगार हे काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजित तांबे यांचे अत्यंत जवळचे सहकारी समजले जातात. आज  नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकालही लागणार आहे. त्याच दिवशी ही दु:खद बातमी येऊन धडकल्याने धक्का बसल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. सत्यजित तांबे यांनी स्वतः ट्विट करत आपल्या जवळच्या सहकाऱ्यांला श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात