रत्नागिरी, 2 फेब्रुवारी : विधान परिषदेच्या पाच जांगापैकी एका जागेचा निकाल हाती आला आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत, त्यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना एकूण 20 हजार 83 मतं पडली तर बाळाराम पाटील यांना 10 हजार 997 मतं पडली. म्हात्रे यांचा एकूण 9 हजार 86 मतांनी विजय झाला आहे. हा भाजपसाठी मोठा दिलासा असून, दुसरीकडे महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याांनी या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. पाच विधान परिषदेपैकी एकाचा निकाल हाती आला आहे. चार निकाल अद्याप बाकी आहेत, अमरावती, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार पुढे आहे. अडीचपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, मग नंतर बोलू असं पटोले यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं पटोले यांनी?
कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभवर केला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पाच विधान परिषदेपैकी एकाचा निकाल हाती आला आहे. चार निकाल अद्याप बाकी आहेत, अमरावती, नागपूरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार पुढे आहे. अडीचपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, मग नंतर बोलू' असं पटोले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : पहिला निकाल हाती, कोकण शिक्षक मतदारसंघात मविआला धक्का, भाजपचं खातं उघडलं!
म्हात्रे यांची प्रतिक्रिया
दरम्यान विजयनंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'हा माझा एकट्याचा विजय नाही, हा माझ्या मतदारसंघातून संपूर्ण शिक्षकांचा विजय आहे. मी गेल्या सहा वर्षांमध्ये जे काम केलं त्याची पोचपावती मला माझ्या मतदारसंघातील शिक्षकांनी दिली. तब्बल 33 संघटनांचा आम्हाला पाठिंबा होता. मुख्यमंत्री आणि पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो' असं म्हात्रे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MLC Election