जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : भंगारपासून नवं विश्व बनवणारा अफलातून मुंबईकर, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

Video : भंगारपासून नवं विश्व बनवणारा अफलातून मुंबईकर, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

Video : भंगारपासून नवं विश्व बनवणारा अफलातून मुंबईकर, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

मुंबईकर मिथिलेशनं भंगारातील वस्तूंपासून नवं विश्व बनवलं आहे. त्याच्या या कलाकृती पाहून तुमच्या डोळ्यांना विश्वास बसणार नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 16 नोव्हेंबर : कला ही माणसाला समृद्ध बनवते. कलाकार नेहमीच कोणत्याही गोष्टींमध्ये कला शोधत असतो.  गॅरेज मधील भंगारमध्ये गेलेल्या वस्तूंपासून वेगवेगळ्या कलाकृती साकारता असा विचार तुम्ही केला नसेल. मात्र नवी मुंबईत राहणाऱ्या मिथिलेश शर्मानं गॅरेजमधील नटबोल्टपासून ते वाहनाच्या मोठमोठल्या स्पेअर पार्ट्सचा वापर करून वेगवेगळ्या कलाकृती बनवल्या आहेत. कधी झाली सुरूवात? मिथिलेशला 6 वर्षांपूर्वी गॅरेजमध्ये भंगार फेकलेलं दिसलं. तेव्हाच त्याला या वस्तू बनवण्याची कल्पना सुचली. त्यानं नटबोल्ट, वाहनाची चेन, शॉकअप्स या गोष्टींचा वापर करून कलाकृती साकारायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या कलाकृतींना मागणी येऊ लागली. नवी मुंबईतील अनेक चौकांमध्ये लोखंडापासून बनवलेल्या कलाकृती लावण्यात आल्या आहेत. वाहनांच्या भंगार पासून बनवलेली वाहनं, अनेक संदेश देणाऱ्या कलाकृती मिथिलेशने बनवल्या आहेत. अनेक शहरांमधून सुद्धा आता या कलाकृतीची मागणी होत आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    कोणत्या वस्तूंचा होतो वापर? नटबोल्ट, शॉकअप्स, लोखंडी सळई, वाहनाची चेन, असे वेगवेगळे पार्ट्स वापरून या कलाकृती साकारल्या जातात तसंच यात अनेक बारीक पार्ट्स देखील असतात. या वस्तूंना वेल्डिंग करताना विशेष काळजी घ्यावी लागते. मिथिलेशने या वस्तूंपासून कॅमेरा लॅम्प, दुचाकी लॅम्प, घड्याळ, घड्याळतला लॅम्प, विविध शोभेच्या वस्तू, किटकांचे आकार, प्राणी, वाद्य, बंदूक बनवले आहे. या सर्व वस्तू शोभेच्या आणि आकर्षक असल्यामुळे ऑनलाईन विक्री सुद्धा होते. शहराचं सौंदर्य वाढवणाऱ्याला पालिका देणार बक्षीस, तुम्हालाही मिळू शकते संधी! पाहा Video मला काहीही टाकाऊ वस्तू दिली की ती उपयोगात आणतो आणि अश्या कलाकृती बनवतो, लोखंडापासून एखादी वस्तू बनवायची असेल तर त्यासाठी खुप सावधतेने काम करावं लागतं या वस्तू बनवण्यामागे खुप मेहनत असते. असं मिथिलेश शर्मा म्हणतो. या वस्तूंची किंमत काय? टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवताना त्याला व्यवस्थित फिनिशिंग करावं लागतं.या कलाकृती 1500 रुपयांपासून विकल्या जातात. स्कल्पचरची किंमत त्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर आधारित असते. लहान कलाकृती 5000 हजारापर्यंत मिळतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , mumbai
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात