नाशिक, 1 ऑक्टोबर : तुम्ही बाईकने रस्त्याने जात आहात आणि अचानक बाईकच्या खोपडीतून नाग फणा काढून बाहेर आला तर? खरंतर हा भयानक प्रसंग कदाचित आपल्या स्वप्नात आपल्याला दिसू शकतो, असा तुम्ही विचार करु शकता. पण येवल्यात हे वास्तव्यात घडलं आहे. एक व्यक्ती दुचाकीने बाईक चालवत असताना अचानक नाग बाईकच्या खोपडीतून फणा काढून उभा राहिली. यावेळी बाईकचालकाचे तर सात गेले आणि पाच राहिले. या प्रसंगी बाईक चालकाने केलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव वाचला, असं बोललं वावगं ठरणार नाही. भरधाव वेगाने मोटारसायकल जात असताना अचानक हॅन्डलजवळ असलेल्या हेडलाईटच्या खोपडीतून नागोबा बाहेर आला. त्याने फणा काढला. यावेळी हॅन्डलजवळ नाग पाहून चालकाची घाबरगुंडी उडाली. त्याने वेळीच मोटारसायकल थांबवून दूर पळून गेल्यामुळे त्याचा जीव वाचला. ही धक्कादायक घटना येवल्यात घडली.
भरधाव वेगाने मोटारसायकल जात असताना अचानक हॅन्डलजवळ असलेल्या हेडलाईटच्या खोपडीतून नागोबा बाहेर आला. त्याने फणा काढल्या. यावेळी हॅन्डलजवळ नाग पाहून चालकाची घाबरगुंडी उडाली. नाशिकच्या येवल्यातील धक्कादायक प्रकार, अखेर सर्पमित्रांनी नागास सुरक्षित गाडीतून बाहेर काढले #snake #Nashik pic.twitter.com/QGjKtxqugL
— News18Lokmat (@News18lokmat) October 1, 2022
विशाल देटके हे त्यांच्या पल्सरवरून बाजारात जात असताना मोटरसायकलच्या हॅन्डल जवळ हेडलाईट असलेल्या खोपडीत लपून बसलेला नाग अचानक बाहेर आला. त्याला पाहून देटके घाबरले आणि त्यांनी तातडीने मोटारसायकल थांबवली आणि ते बाजूला झाले. त्यानंतर सर्प मित्र दीपक सोनवणे आणि फिटर किरण कवडे यांना बोलविण्यात आले. ( बापरे! वाशीतून चक्क 1476 कोटींचे ड्रग्ज जप्त, DRI ची सर्वात मोठी कारवाई ) सर्पमित्र किरण कवडे यांनी मोटारसायकलची खोपडी खोलली तर सोनवणे यांनी नागाला पकडून त्याला जेरबंद केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. नागाला पकडण्यात आल्यानंतर देटके यांचा जीव भांड्यात पडला. नशीब बलवत्तर होतं म्हणून नागाच्या तावडीतून सुटता आलं, अशी भावनी त्यांच्या मनात येऊन गेली.