Home /News /maharashtra /

Nashik : 'खट्टा-मीठा, जलजीरा'सह 'इथं' मिळतील चक्क सहा पाणीपुरी फ्लेवर, पहा VIDEO

Nashik : 'खट्टा-मीठा, जलजीरा'सह 'इथं' मिळतील चक्क सहा पाणीपुरी फ्लेवर, पहा VIDEO

श्री

श्री स्वामी समर्थ फ्लेवर पाणीपुरी, नाशिक

नाशिक तसं पाहिलं तर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तसं ते खाद्यपदार्थांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. सद्या शहरातील श्री स्वामी समर्थ फ्लेवर पाणीपुरी अनेकांना भुरळ घालत आहे. इथं सहा प्रकारचे पाणीपुरी फ्लेवर खाण्यास मिळतात.

    नाशिक, 1 जुलै : नाशिक तसं पाहिलं तर अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तसं ते खाद्यपदार्थांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. सद्या शहरातील श्री स्वामी समर्थ फ्लेवर पाणीपुरी (Shri Swami Samarth Flavor Panipuri in Nashik) अनेकांना भुरळ घालत आहे. या पाणीपुरीची शहरातच नव्हे तर नाशिक जिल्ह्याबाहेर देखील जोरदार चर्चा आहे. आतापर्यंत तुम्ही एक नाही तर दोन प्रकारच्या पाणीपुरीची चव चाखली असेल. मात्र, इथं तुम्हाला सहा प्रकारचे पाणीपुरी फ्लेवर खाण्यास मिळतात. कोणते आहेत ते सहा प्रकारचे पाणीपुरी फ्लेवर (Panipuri  Flavor) पाहूया या विशेष रिपोर्टमधून. शहरातील पवननगर भागात राहणाऱ्या बबलू पाटील आणि पंकज पाटील यांनी श्री स्वामी समर्थ फ्लेवर पाणीपुरी स्टॉल शहरात सुरु केला. अगोदरचे काही दिवस नाशिककरांची पाणीपुरी खाण्यासाठी फारशी ओढ नव्हती. मात्र, काही दिवसातच नाशिककरांच्या पसंतीस ही पाणीपुरी उतरली आहे. नाशिकमध्ये जास्तीत जास्त दोन तीन फ्लेवर मिळतात. नाशिक हे खवय्यांचे ठिकाण असल्यामुळे इथे पाणीपुरीचे वेगवेगळे फ्लेवर चालू शकतात असा विचार बबलू पाटील आणि पंकज पाटील यांनी केला. परंतु, वेगवेगळ्या फ्लेवरची माहिती घ्यायची तर आपल्याला गुजरातला जावं लागेल. मग दोघांनी विचार करत निर्णय घेतला की गुजरातला जाऊन आपण सर्व शिकून घेऊ कारण तिकडे पाणीपुरीचे बरेच प्रकार बघायला मिळतात. तिकडे शिकल्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये ही सहा प्रकारचे पाणीपुरी फ्लेवर सुरू केले आता त्यांना ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. वाचा : टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा; नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं शहरात कुठं मिळते पाणीपुरी नाशिकमध्ये श्री स्वामी समर्थ फ्लेवर पाणीपुरी पवननगर भाजी मार्केट परिसरात सद्गुरू हॉटेल समोर मिळते. या पाणीपुरी स्टॉलची वेळ ही दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत आहे. इथं वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या ऑर्डर देखील स्वीकारल्या जातात. मालकांशी संपर्क करायचा असेल तर बबलू पाटील, 8600829744, पंकज पाटील, 8265033071 या क्रमांकांवर यांना संपर्क साधू शकतात. या पाणीपुरीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे कांदा आणि कोथंबिर कमी टाकली जाते. त्यामुळे प्रत्येक फ्लेवरची चव आपल्याला वेगवेगळी येते. गुगल मॅपवरून सांभार... सहा प्रकारचे पाणीपुरी फ्लेवर 1) रेग्युलर - हा जो प्रकार आहे. हा जरा तिखट आहे म्हणजे यांची चव तिखट आहे. यात मिरचीची पेस्ट मिक्स केली जाते. 2) हाजम हाजमा - याची चव गोड आहे. हाजम हाजमा हा साखरेचा पाक आणि कोथंबिर पासून बनवलेला आहे. 3) पुदिना - हा प्रकार पुदिना भाजी आणि कोथंबिर पासून बनवलेला आहे. पुदिना भाजीची जशी चव असते. अगदी तशीच या फ्लेवरची चव येते. 4) लसूण - यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली जाते. त्यापासून हा फ्लेवर बनवला जातो. लसनासारखीच या फ्लेवरची चव आहे. 5) जलजीरा - जलजीरा आणि साखर मिक्स करून हा फ्लेवर बनवला जातो. याची चव मध्यम गोड असते. 6) खजूर इमली - यामध्ये चिंच,खजूर,साखर मिक्स केली जाते. याची इमली सारखी चव असते. वाचा : Nashik Fact check : त्र्यंबकेश्वरच्या पिंडीवर पुन्हा दिसला चमत्कारिक बर्फ; तो फोटो खरा की खोटा? पाणीपुरी स्टॉल मालक बबलू पाटील सांगतात की, "वाटलं नव्हतं नाशिककरांचा इतका भरघोस प्रतिसाद मिळेल. मात्र, त्यांनी चांगली साथ दिल्यामुळे माझा व्यवसाय चांगला चालला आहे. नागरिकांना देखील चांगल्या दर्जाची पाणीपुरी मिळावी म्हणून मी राजस्थान आणि गुजरातमध्ये जाऊन या सहा प्रकारच्या पणीपुरीचे प्रशिक्षण घेतले. सर्व आल्यानंतर पवननगर मध्ये पाणीपुरी सुरू केली."
    First published:

    Tags: Food, Nashik, Recipie, Tasty food

    पुढील बातम्या