जाहिरात
मराठी बातम्या / देश / टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा; नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा; नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा; नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

तुमच्या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडले आहे. तुमच्या वक्तव्यामुळे देशाची बदनामी झाली आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माची याचिका फेटाळून लावली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 1 जुलै : प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकारले आहे. तुमच्या वक्तव्याने देशातील वातावरण बिघडले आहे, असे सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना सुनावले. तुम्ही टीव्हीवर जाऊन माफी मागावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही बेजबाबदार विधान केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्ही स्वत:ला वकील म्हणता, तरीही असे वक्तव्य केले. तुमच्या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडले आहे. तुमच्या वक्तव्यामुळे देशाची बदनामी झाली आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माची याचिका फेटाळून लावली. याप्रकरणी तुम्ही उच्च न्यायालयात जा, असे न्यायालयाने सांगितले. नुपूर शर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध विविध राज्यांत दाखल झालेले सर्व खटले दिल्लीला हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला होता. ‘त्यांच्याकडे एकच ‘नाथ’, बाकी सगळे ‘अनाथ’’; महाराष्ट्रातील राजकारणावरुन या मुख्यमंत्र्याचा काँग्रेसला टोला नुपूर शर्मा यांनी आधीच माफी मागितली आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माच्या आधीच्या माफीबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. तुमची माफीही सशर्त असल्याचे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणी कडक भूमिका घेत, तुम्ही माफी मागायला उशीर केला, असे म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी राजधानीत दाखल केलेल्या तक्रारीवर आतापर्यंत केलेल्या कारवाईवरही सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. नुपूर शर्माच्या वक्तव्यामुळे उदयपूरची घटना घडल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तुम्हाला असे वक्तव्य करण्याची काय गरज होती, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं रात्री उशिरा गोव्यात जंगी स्वागत; आमदारांच्या जल्लोषाचा नवा VIDEO ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगासंदर्भात एका टीव्ही चर्चेदरम्यान नुपूर शर्माने मोहम्मद यांच्यावर कथितपणे वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. यानंतर भाजपने राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हकालपट्टी केली होती. इतकेच नाही तर पक्षाच्या दिल्ली युनिटचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात