मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

यांची लायकी आहे का? संजय राऊत प्रसाद लाड यांच्यावर भडकले

यांची लायकी आहे का? संजय राऊत प्रसाद लाड यांच्यावर भडकले

 'महाराजांचा जन्म कुठे झाला हे अख्या जगाला माहित आहे. हे नवीन नवीन शोध लावत आहे. यांनी इतिहास मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का?

'महाराजांचा जन्म कुठे झाला हे अख्या जगाला माहित आहे. हे नवीन नवीन शोध लावत आहे. यांनी इतिहास मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का?

'महाराजांचा जन्म कुठे झाला हे अख्या जगाला माहित आहे. हे नवीन नवीन शोध लावत आहे. यांनी इतिहास मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  sachin Salve

नाशिक, 04 डिसेंबर : 'कोण प्रसाद लाड, ते काय दत्तू मामा पोतदार आहे का, यदुनाथ सरकार आहे का, मुळात भाजपचं डोकं फिरलं आहे. रोज नवे विधानं केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जी भवानी तलवार आहे ना, एक दिवस त्या तलवारीने यांचे मुंडक छाटणार आहे' असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीका केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणामध्ये झाला होता, असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लाड यांच्यावर सडकून टीका केली.

'कोण प्रसाद लाड, ते काय दत्तू मामा पोतदार आहे का, यदुनाथ सरकार आहे का, मुळात भाजपचं डोकं फिरलं आहे. रोज नवे विधानं केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जी भवानी तलवार आहे ना, एक दिवस त्या तलवारीने यांचे मुंडक छाटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती यांना खत्म करेल असं वाटतंय की यांच्या स्वप्नात अफजल खान आणि औरंगजेब येतो, यांच्या कानात काहीतरी मंत्र देतात आणि हे बोलतात यांची लायकी आहे का? असा सवाल करत राऊत यांनी लाड यांना फटकारलं.

('शिवरायांचा जन्म हा कोकणामध्ये झाला होता' भाजप आमदार प्रसाद लाड बरगळले)

'महाराजांचा जन्म कुठे झाला हे अख्या जगाला माहित आहे. हे नवीन नवीन शोध लावत आहे. यांनी इतिहास मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का? ज्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांनी निती आयोगाची नव्याने स्थापना करून, त्यांच्या बिल्डर मित्राची वर्णी लावली. त्याप्रमाणे भाजपने इतिहास मंडळाची स्थापना करून लाड ग्वाड बोलत आहे,हे आता महाराष्ट्राचा नवीन इतिहास लिहिणार का? असा टोलाही राऊत यांनी लगावला.

हे सरकारला आणि महाराष्ट्राला दिलेले आव्हान आहे. मी आजच वृत्तपत्रात वाचलं. आशिष शेलार म्हणतात की, कर्नाटकच्या आरेला कारेने उत्तर देऊ, अरे पण कर्नाटक आतमध्ये घुसले आहे. तुम्ही कधी कारे करणार आहे. तुमच्या थोबाडावर त्यांनी पोस्टर लावलंय. चुल्लूभर पाणी में डूब जाओ अशी तुमची अवस्था झाली आहे. आता आरे ला कारे करण्याची आता जबाबदारी विरोधी पक्षाची आहे, उद्या तुम्हाला कळेल, असा पलटवारही राऊत यांनी केला.

(सुप्रिया सुळेंवर टीका भोवली, 'सत्तारांवर योग्य ती कारवाई करा', राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र)

'उदयनराजेंनी पत्र पाठवले आहे. यात राष्ट्रपती भवन काहीही करू शकत नाही. यावर कारवाई पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी कारवाई करावी. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती या संस्थांची सध्या काय अवस्था आहे माहित आहे ना. महाराष्ट्राची जनता हीच ताकद आहे उदयनराजे आणि संभाजीराजे हे आपल्या आपल्या पद्धतीने जागरूकता तयार करत आहे. विरोधी पक्ष देखील लवकरच भूमिका जाहीर करेल, असंही राऊत म्हणाले.

जे लोक शिवाजी महाराज यांच्याविषयी अभद्र भाषा वापरतात, ते शिवसेनेवर काहीही बोलू शकतात. ते शिवसेनेविषयी अशीच भाषा वापरणार, जे छत्रपतींना सोडत नाही, ते आम्हाला काय सोडणार, आम्हाला कुणाला डिवचण्याची हिंमत नाही, असंही राऊत म्हणाले.

First published:

Tags: Marathi news