मराठी बातम्या /बातम्या /agriculture /Bamboo Farming : आयटी क्षेत्रातील तरुणानं बांबू शेतीमध्ये केला जागतिक रेकॉर्ड! पाहा Video

Bamboo Farming : आयटी क्षेत्रातील तरुणानं बांबू शेतीमध्ये केला जागतिक रेकॉर्ड! पाहा Video

X
Bamboo

Bamboo Farming : आयटी क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या नाशिकमधील तरूणानं बांबूच्या शेतीमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे.

Bamboo Farming : आयटी क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या नाशिकमधील तरूणानं बांबूच्या शेतीमध्ये नवा रेकॉर्ड केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

    विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी

    नाशिक, 2 फेब्रुवारी : उच्च शिक्षण घेतलेले तरुण काही खास प्रयोग करण्यासाठी शेती सुरू करतात. त्यांच्यातील अभ्यासाचा, संशोधक वृत्तीचा, अद्ययावत ज्ञानाचा शेतीला फायदा होतो. त्यामधून नवे प्रयोग यशस्वी होतात. नाशिक जिल्ह्यातील एका तरुणानंही बांबूच्या शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. जगभरातील 96 प्रजातींच्या बांबूचे संकलन त्यानं केले असून त्याच्या या प्रयोगाची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही दखल घेतली आहे.

    काय आहे प्रयोग?

    प्रशांत दाते असं या प्रयोगशील शेतकऱ्याचं नाव आहे. तो मूळचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगावचा मात्र त्याचं कुटुंब आता नाशिकजवळच्या लाखलगाव इथं स्थायिक झालंय. वडील आत्माराम दाते हे शेतकरी असल्यामुळे लहानपणापासूनच प्रशांतला शेतीची आवड होती. त्याचबरोबर शिक्षणातही रस असल्यानं त्यानं आयटी क्षेत्रातील डिप्लोमा केला. या शिक्षणानंतर नोकरी मिळेल का याची काळजी करत बसण्यापेक्षा वडिलांच्या सल्ल्यानुसार त्यानं शेती करण्यास सुरूवात केली.

    प्रशांतनं पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीनं शेती करण्याचं ठरवलं होतं. याच काळात त्याची एका वन अधिकाऱ्याची भेट झाली. त्यांनी प्रशांतला बांबूच्या शेतीची माहिती दिली. या भेटीनंतर त्यानं आपला शेतीमधील फोकस निश्चित केला.

    पिकांचं होणार किटकांपासून संरक्षण, शेतकऱ्यांच्या कामाचं आहे हे यंत्र, Video

    96 प्रजातींच्या बांबूचं संकलन

    कोणतीही शेती करायची म्हणजे त्या विषयी आपल्याला सविस्तर माहिती हवी. त्या विषयात अभ्यास हवा त्यानंतरच ती शेती चांगली होऊ शकते. प्रशांतनं मिळेल त्या मार्गानं बांबूच्या शेतीबद्दलची माहिती गोळा केली.  वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांना भेट दिली.  बांबूचे प्रकार कोणते ? कोणत्या प्रदेशात कोणत्या बांबूची लागवड केली जाते ? हवामान कसं हवं? याबाबत कृषीतज्ज्ञांकडून माहिती घेतली आणि जगभरात फिरून 96 प्रजातींच्या बांबूचं संकलन केले.

    जगभरात जवळपास 148 प्रजातींचे बांबू असल्याची माहिती आहे,त्यातील 96 प्रजातींचे संकलन प्रशांतने केले आहे. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कुठेही संकलन नसल्याचं त्यानं सांगितलं. बकाल बांबू, बिधुली बांबू, स्पेनडर बांबू, वेल बांबू,लतन्यान बांबू,सिल्क बांबू,गोहरा बांबू, का काळा बांबू, कटांग बांबू,छोटा बांबू, सरूबिजली बांबू,खोकवा बांबू, मुडी बांबू, सीएट बांबू,मलिंग बांबू, काली बांबू, ताकसेहरा बांबू,अशा जवळपास 96  प्रजातींच्या बांबूचं त्यानं संकलन केलं आहे.

    राज्यपालांची कौतुकाची थाप

    प्रशांतनं चांगलं शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता आधुनिक शेती केली. त्याच्या या प्रयोगाची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, संभाजीराजे छत्रपती यासारख्या दिग्गजांनी घेतली आहे. त्यांनी प्रशांतच्या शेतीची पाहणी करत त्याच्याकडून या विषयातील माहिती घेतली. त्याचबरोबर या यशस्वी प्रयोगासाठी त्याचं अभिनंदन केलं.

    दुर्मीळ झाडांना हात न लावता उभा राहिला महामार्ग, वाचा कसा झाला चमत्कार!

    ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्याने बांबूच्या शेतीचा केलेला यशस्वी प्रयोग हा इतर शेतकऱ्यांसाठी ही प्रेरणादायी आहे. त्यानं केलेल्या या संकलनाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड या दिग्गज संस्थांनीही घेतली आहे. बांबूची शेती हे व्यापक क्षेत्र आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी इकडं वळलं पाहिजे असं प्रशांत यांचं मत आहे. त्यामुळे ही शेती बघण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असलेलं सर्व मार्गदर्शनही ते करत आहेत.

    First published:

    Tags: Agriculture, Farmer, Local18, Nashik