नाशिक, 31 ऑक्टोंबर : नाशिक जिल्ह्यात विविध पर्यटन स्थळ आहेत. त्यातील एक विशेष म्हणजे नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर वाढोली फाटा इथे असलेले शांती - कृष्ण म्युझियम ऑफ मनी अँड हिस्ट्री हे नाणे संग्रहालय.
नाशिकच्या
या नाणे संग्रहालयात विविध काळातील नाण्यांचा मोठा संग्रह आहे. आशियातील अशा प्रकारचे हे एकमेव नाणे संग्रहालय आहे. जे भारताला नाणकशास्त्राचे ज्ञान मिळवण्यास मदत करते. या संग्रहालयात विविध ऐतिहासिक वास्तूंचे जतन केले आहे. पुरातन नाणे, नोटा यांच्यासह इतर ऐतिहासिक वस्तूं या ठिकाणी पुरातन नाणे, नोटा यांच्यासह इतर ही ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन या ठिकाणी आहे. वाद्य, दगडाचे हत्यार, लोखंडाचे हत्यार, दगड, मातीचे मडके, पगडी, नाणे, नोटा, शिक्के, वनस्पती, राजे महाराजांच्या काळात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, टांगा विविध प्रदेशात माती पासुन वापरली जाणारी साहित्य, पुरातन काळात मानवाने वापरलेली लोखंडी हत्यार,अशा विविध ऐतिहासिक वस्तू या संग्रलाहायात पर्यटकांना बघण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. हेही वाचा :
Solapur : लोहपुरूष सरदार पटेलांच्या कार्याला सोलापूरकरांचा सलाम, पाहा Video विशेष म्हणजे प्रत्येक वस्तूची सविस्तर माहिती देखील या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहे. ती वस्तू निर्माण कधी झाली. तिचा उपयोग काय झाला. कोणत्या प्रदेशात त्या वस्तूला अधिक मागणी होती अशी सविस्तर माहिती पर्यटकांना वाचण्यासाठी उपलब्ध आहे. या संग्रहालयात प्राचीन नाण्यांचा मोठा साठा प्राचीन नाणे संग्रहालय म्हणून नाशिकचे हे संग्रहालय प्रसिद्ध आहे. या ठिकाणी प्राचीन नाण्यांचा मोठा साठा सविस्तर माहितीसह उपलब्ध आहे. प्राचीन नोटा देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. संबंधित वस्तूची माहिती या ठिकाणी मिळत असल्यामुळे पर्यटकांची जास्त पसंती या संग्रहालयाला असते. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हे संग्रहालय महत्वाचे फक्त नाशिक जिल्ह्यातून नव्हे तर देशभरातून पर्यटक या प्राचीन नाणे संग्रहालयाला भेट देण्यासाठी येत असतात. तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ही जास्त ओघ असतो. सविस्तर माहितीसह वस्तू बघायला मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासात फायदा होतो. त्यामुळे जास्त विद्यार्थी या ठिकाणी येत असतात. हेही वाचा :
Mumbai : ‘बबल टी’ म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? पाहा काय आहे वेगळेपण Video या संग्रहालयाला भेट देऊन पर्यटक होतात खुश या संग्रहालयाला भेट देऊन खूप आनंद झाला. या ठिकाणी प्राचीन नाणी आणि प्राचीन संस्कृती विषयी खूप माहिती मिळाली. आपल्या संस्कृतीत जेव्हा पासून चलन आले तेव्हापासून तर आजपर्यंतची सखोल माहिती आणि नाणी, नोटा या ठिकाणी बघायला मिळाल्या. नवीन पिढीसाठी हे संग्रहालय खूप मोठं मार्गदर्शक ठरणार आहे. विशेष म्हणजे नंबरनुसार सविस्तर माहिती उपलब्ध असल्यामुळे चांगली माहिती मिळत असल्याची प्रतिक्रिया पर्यटक जगदीश कुलकर्णी यांनी दिली आहे. प्राचीन फोटोग्राफी तसेच विविध प्रोजेक्ट्स कसे चालायचे या विषयी देखील या ठिकाणी सविस्तर माहिती उपलब्ध आहे. ऐतिहासिक वस्तूंचा आता कुठे तरी विसर पडत चालला आहे. मात्र अशा प्राचीन वस्तूंच्या संग्रहालयामुळे पुन्हा एकदा आपल्याला आपल्या संस्कृती विषयी माहिती मिळते आणि तेव्हाच्या काळात काय परिस्थिती होती याची जाणीव होते. त्यामुळे खूप सुंदर बघण्यासारखे हे संग्रहालय आहे. त्यामुळे सर्वांनी आवश्य एकदा भेट द्यावी, अशी प्रतिक्रिया पर्यटक मनोज कुलकर्णी यांनी दिली आहे. हेही वाचा :
Nashik : अक्षरांचे सौंदर्य इतरांना कळण्यासाठी ‘त्याने’ तयार केली 7 हजार नावं, VIDEO
कुठे आहे हे संग्रहालय? नाशिक - त्र्यंबकेश्वर रोडवर वाढोली फाटा इथे हे संग्रहालय आहे.सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पर्यटकांना बघण्यासाठी खुले असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.