नाशिक, 24 ऑक्टोबर : प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. कसलाच छंद नाही अशी व्यक्ती सापडणं विरळच. आपल्या समाधानासाठी तो छंद जोपासण्याचे काम ती व्यक्ती करत असते. असाच एक छंद नाशिकचे सुप्रसिद्ध अक्षर रचनाकार सुनील धोपावकर यांना जडला आहे. प्रत्येक अक्षराला त्याच्या अर्थानुसार शरीरसौष्ठव देत दोन अक्षरांतील डोळ्यांना सुखावणारा तसेच शब्दात न सांगता येणारा आंतरिक सेन्स अभिव्यक्त करण्याची जादू अक्षर रचनाकार सुनील धोपावकर यांच्या टायपोग्राफीत आहे. त्यांची बोलकी अक्षरे सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. …अशी मिळाली अक्षरांकडे बघण्याची नवी दृष्टी मुळात अक्षर लेखनाची आणि चित्रकलेची आवड सुनील यांना लहानपणापासुनच होती. वैशिष्टयपूर्ण शब्द कसे असतील याकडे त्यांच बारकाईने लक्ष असायचं. पुढे जाऊन त्यांनी मुंबईमध्ये जेजे स्कूल ऑफ आर्टसमध्ये जाहिरात कलेचे शिक्षण घेतले. तिथं शिकत असताना अक्षर महर्षी म्हणून ज्यांना ओळखलं जायचं त्या कमल शेडगे यांच्या अक्षरांचे प्रदर्शन लागले होते. त्याच प्रदर्शनाने सुनील यांना अक्षरांकडे बघण्याची नवी दृष्टी मिळाली. विशेष म्हणजे अक्षरे चांगली दर्जेदार आणि वेगळेपण दाखवणारी असतील तर त्यांना मागणी चांगली असते. हे त्यांच्या तेंव्हा लक्षात आलं आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी अक्षरांवर जोमाने काम करण्यास सुरुवात केली. हेही वाचा : Nashik : झणझणीत मिसळसह खा भजे, नाशिकमध्ये मिळतंय भन्नाट कॉम्बिनेशन, Video मराठी भाषेत अशा फॉन्टची कमतरता आपली मराठी भाषा खूप छान आहे. मात्र, असे वेगवेगळे फॉन्ट उपलब्ध नाहीयेत. शब्दाला शोभेल असे फॉन्ट नाहीयेत. त्यामुळे शब्दांमध्ये जिवंतपणा येत नाही. जसे इंग्रजी मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट उपलब्ध आहेत. विषयाला शोभणारे फॉन्ट आहेत. यामुळे मराठीत काम करावं असं सुनील यांना वाटत असल्यामुळे त्यांनी ही सुरुवात केली. मराठी माणसाला अक्षरांचे सौंदर्य कळण्यासाठी हा प्रयत्न मराठी भाषा जपली पाहिजे वाचली पाहिजे आपण सतत म्हणतो. मात्र तिचं सौंदर्य काय आहे. हे देखील मराठी माणसांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. त्यामुळे सुनील यांनी अक्षरांचे प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतला आणि राज्यातील विविध शहरांमध्ये त्यांनी ही प्रदर्शनं भरवली. मात्र, इथंच न थांबता संपूर्ण भारतभर ही प्रदर्शन करण्याचा मानस आहे, असं अक्षर रचनाकार सुनील धोपावकर सांगतात. आतापर्यंत त्यांनी जवळपास मराठी आणि हिंदी धरून 7 हजार नावं बनवली आहेत. ही बोलकी अक्षर मनात भरतात सुनील धोपावकर यांची ही बोलकी अक्षर बघितली की माणूस आपोआप शब्दांच्या प्रेमात पडतो. त्यांनी बनवलेलं नाव जणू जिवंत असल्याचा भास होतो. अतिशय सुंदर प्रकारे ते शब्दांची डिझाईन करतात. त्यांच्या या कलेला मनापासून नागरिक दाद देत आहेत. हेही वाचा : Nashik : 77 वर्षांच्या आजीबाईंनी स्विमिंगमध्ये पटकावले 3 गोल्ड आणि 2 सिल्व्हर! पाहा Video तुमचं ही नाव डिझाईन करून मिळेल त्यांच्या या कलेचा प्रचार प्रसार झाल्यामुळे अनेक नागरिकांकडून आपली नाव बनवण्याची मागणी होत असल्यामुळे ते नाव बनवून डिझाईन करून देतात. एका नावाचे 550 रुपये घेतात. महाराष्ट्रात कुठे ही द्यायचे आले तरी कुरियर द्वारे पोहचवले जाते. अधिक माहितीसाठी 9763338020 दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. गाजलेले शब्द शिंदे, त्रिशूल, प्रवेशबंद, बॉम्ब वाचवा, नळ, बेल, महापूर, स्टार्टअप, विचार, छत्रा,डोळे, मेक इन इंडिया, अष्टप्रधान,असे असंख्य शब्द त्यांचे गाजलेले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.