जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Solapur : लोहपुरूष सरदार पटेलांच्या कार्याला सोलापूरकरांचा सलाम, पाहा Video

Solapur : लोहपुरूष सरदार पटेलांच्या कार्याला सोलापूरकरांचा सलाम, पाहा Video

Solapur : लोहपुरूष सरदार पटेलांच्या कार्याला सोलापूरकरांचा सलाम, पाहा Video

Sardar Vallabhbhai Patel: अखंड भारताचे शिल्पकार, लोहपुरुष अशी सरदार वल्लभभाई पटेल यांची ओळख आहे.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 31 ऑक्टोबर : थोर स्वातंत्र्यसैनिक आणि देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज (31 ऑक्टोबर) जयंती आहे. 1947 साली भारत स्वतंत्र झाला त्यावेळी देशातील अनेक संस्थानिकांचा प्रश्न तसाच होता. या संस्थानिकांना त्यांच्या मर्जीप्रमाणे स्वत:चे भवितव्य ठरवण्याचा अधिकार इंग्रजांनी दिला होता. ही संस्थानं स्वतंत्र राहिली असती तर तो स्वतंत्र भारताच्या अस्तित्वासाठी मोठा धोका ठरला असता. सरदार पटेलांनी हा धोका वेळीच ओळखला. त्यांनी सर्व संस्थानांचे भारतामध्ये विलिनिकरण केले. त्यांच्या या कामगिरीमुळे अखंड भारताचे शिल्पकार, लोहपुरुष अशी त्यांची ओळख आहे. सोलापूरकरांकडून स्मरण सरदार पटेलांची जयंती ही राष्ट्रीय एकता दिन म्हणून देशभर साजरी केले जाते. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. ’देशातील संस्थानांचे विलिनीकरण आणि भारताते एककीकरण करण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांचे जीवनकार्य आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदार दर्शविणारे हे प्रदर्शन आहे. देशाची एकता आणि अखंडता याचे दर्शन घडवण्याचा या प्रदर्शनातून मानस आहे, ’ असे मत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी यावेळी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंचप्राण म्हणून सरदार पटेल यांचा उल्लेख केला होता, असेही स्वामी यांनी यावेळी सांगितले. या महापुरुषाच्या आयुष्यावरील हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रत्येक सोलापूरकरांनी यावं, असं आवाहनही स्वामी यांनी केलं. सोलापूरच्या पुजाची कमाल, हार्वर्ड विद्यापीठात मिळवले स्थान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील सर्व दुर्मिळ छायाचित्रांसोबतच त्याच्या संदर्भात असणारी माहिती या प्रदर्शनात देण्यात आली आहे. वल्लभाई पटेल यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. तसंच  दुर्मिळ छायाचित्रांचाही यामध्ये समावेोश करण्यात आला आहे. 31 ऑक्टोबर रोजी रात्री 12 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी खुले असेल. गुगल मॅपवरून साभार कुठे सुरू आहे प्रदर्शन? सोलापूर रेल्वे स्टेशनवरील मुख्य तिकीट काऊंटरच्या समोरील बाजूला हे प्रदर्शन सुरू आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: solapur
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात