नाशिक, 15 ऑक्टोंबर : ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन नगरी म्हणून नाशिक शहराची ओळख आहे. पण यासोबतच नाशिक शहर हळूहळू खवय्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जात आहे. एका पेक्षा एक भन्नाट आणि स्वादिष्ट पदार्थ नाशिकमध्ये खवय्यांना खाण्यासाठी मिळतात. त्यातील एक अशोक स्तंभावरील राजगड येथील लोणी स्पंज डोसा खवय्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. लोणी स्पंज डोसा खाण्यासाठी खवय्यांची नेहमीच गर्दी होत असते. नोकरी गेली आणि सुरु केला व्यवसाय दोन वर्षांपूर्वी हर्षल रोकडे या तरुणाची कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर त्याने या व्यवसायात येण्याचा विचार केला. हर्षल हा उच्चशिक्षित आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण त्याने घेतलेले आहे. मात्र, नोकरी गेल्यानंतर हर्षल याने ठरवले की आपण आता नोकरी करण्यापेक्षा व्यवसायात उतरून असं काही करू की जे नाशिक शहरामध्ये चांगले फेमस होईल आणि त्याने अशोक स्तंभावर राजगड मध्ये लोणी स्पंज डोसा सुरू केला. अवघ्या काही दिवसात खवय्यांच्या पसंतीस हा डोसा उतरला आणि आता भरघोस प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे 40 रुपयाच्या एका प्लेटमध्ये पोटभरत आणि मन देखील डोसा खावून तृप्त होत.
हेही वाचा : Video : सिक्रेट मसाला आणि कोळशावरची तर्री, बन्सी पाव भाजीची चव लईच न्यारी
ही आहेत खास वैशिष्टय इथला लोणी स्पंज डोसा हा दावनगिरी पॅटर्नचा डोसा आहे. हा डोसा बँगलोरला अधिक प्रमाणात मिळतो. तसेच मसाला डोसा, म्हैसूर डोसा, शेजवान डोसा, चीज उत्तपा, बॉम्बे उत्तप्पा ही या ठिकाणी मिळतो. अस्सल लोणी वापरलं जात. डोसा बरोबर दोन चमचमीत चटणी खायला मिळतात. एक नारळाची आणि दुसरी टोमॅटोची त्या सोबत बटाट्याची भाजी ही असते आणि सर्व साहित्य उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचे वापरले जाते. त्यामुळे स्पंज डोसा खाण्यासाठी खवय्यांची नेहमीच गर्दी होत असते, असं हर्षल रोकडे सांगतो. हेही वाचा :
Mind It : मुंबईत मिळतो हवेत उडणारा ‘रजनीकांत स्टाईल’ डोसा, पाहा Video खवय्ये ही डोसा खाल्ला की खुश होतात असा डोसा कुठे खायला मिळत नाही. एकदम चविष्ट असा स्पंज डोसा या ठिकाणी खायला मिळतो. मी कायमच या ठिकाणी डोसा खाण्यासाठी येतो. अगदी फ्रेश डोसा या ठकाणी मिळतो, असं खवय्ये स्वप्नील यांनी सांगितले.
गुगल मॅपवरून साभार कुठे आहे हा फेमस डोसा सीबीएस कडून अशोक स्तंभाकडे जाताना अवघ्या काही मीटर अंतरावर राजगड लोणी स्पंज डोसा आहे.