मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Mind It : मुंबईत मिळतो हवेत उडणारा 'रजनीकांत स्टाईल' डोसा, पाहा Video

Mind It : मुंबईत मिळतो हवेत उडणारा 'रजनीकांत स्टाईल' डोसा, पाहा Video

X
Mumbai

Mumbai : रजनीकांतची खास स्टाईल संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. त्याच्या रजनी स्टाईलचा वापर मुंबईतील डोसेवाला करत आहे.

Mumbai : रजनीकांतची खास स्टाईल संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. त्याच्या रजनी स्टाईलचा वापर मुंबईतील डोसेवाला करत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 14 ऑक्टोबर : इडली, डोसा, वडा-सांबार हे दक्षिण भारतीय पदार्थ आता अगदी आपले वाटावे इतके महाराष्ट्रात रुळले आहेत. मुंबईतल्या तर प्रत्येक भागात हे पदार्थ मिळतात. काही ठिकाणी इडलीची चटणी चांगली असते, कुठे डोसा टेस्टी असतो, तर एखाद्या भागातील हॉटेलमध्ये मिळणारा वडा-सांबार खाण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असते. दादरमधील हिंदमाता परिसरात तर थेट रजनीकांत स्टाईल दोसा मिळतो. हा हटके दोसा खाण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते.

    रजनीकांत स्टाईल, सुपर हिट!

    रजनीकांत दक्षिण भारतामधील सुपरस्टार आहे. विशेषत: तामिळनाडूमध्ये तो प्रचंड लोकप्रिय आहे. त्याची 'रजनी स्टाईल' संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. या स्टाईलचं अनुकरण अनेक जण करतात. हिंदमाता परिसरात गेल्या 30 वर्षांपासून डोसा स्टॉल लावणारे मुथू रजनीकांतच्या याच स्टाईलचा वापर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी करत आहेत. ते अगदी रजनीकांतच्या स्टाईलनं ग्राहकांना डोसा देतात. ग्राहकांच्या ताटात देताना उडणारा डोसा पाहण्यासाठी इथं मोठी गर्दी होते.

    कोणत्या प्रकारचे डोसे मिळतात?

    मुथू यांच्या स्टॉलवर चीज डोसा, कांदा टोमॅटो डोसा, मसाला डोसा, मैसूर मसाला डोसा, मैसूर मसाला चीज डोसा, सादा डोसा, उतप्पा, कांदा टोमॅटो उतप्पा, बटर उतप्पा असे 15-20 प्रकारचे डोसे मिळतात.  50 ते 150 रूपये अशी या डोस्यांची किंमत आहे.

    पुण्यातील कॅफेमध्ये पदार्थांची नाही तर वेळेची मोजावी लागते किंमत! पाहा Video

    कधी सुरू होते ही विक्री?

    रोज संध्याकाळी 4.30 वाजता मुथू यांची हातगाडी हिंदमाता परिसरात उभी राहते. रात्री 10.30 च्या सुमारास डोसा विक्री बंद होते. संध्याकाळी पाचनंतर इथं खवय्यांची मोठी गर्दी असते. रोज 250 ते 300 ग्राहक इथं डोसा खाण्यासाठी येतात.

    'रोज संध्याकाळी इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सर्वजण घाई गडबडीत असतात. त्यावेळी सर्वांना आकर्षित करण्यासाठी 20 वर्षांपूर्वी आम्ही रजनीकांत स्टाईलनं डोसा विक्री सुरू केली. डोसा तयार झाला की लांब तव्यावरुन थेट प्लेट सकट तो घसरुन येतो. हे पाहणे ग्राहकांना खूप आवडते. रात्री उशीरापर्यंत इथं गर्दी असते, अशी प्रतिक्रिया या स्टॉलच्या मालकांनी दिली आहे.

    निसर्गरम्य वातावरणात खा चुलीवरची अस्सल झणझणीत मिसळ, Video

    या स्टॉलवर  गरमागरम डोसा आणि सोबत ओल्या खोबऱ्याची चटणी तसेच लाल चटणी मिळते. अगदी पारंपारिक पद्धतीने हा डोसा मिळतो.  सध्या ट्रेंड असलेले कोणतेही डोसे इथं मिळत नाहीत, कारण मुथू डोसावाला यांचा पारंपारिक डोसा मुंबईकरांमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे.

    कुठे खाणार डोसा?

    पी -131,एस. एम. जाधव रोड, मुथू डोसावाला, हिंदमाता, दादर पूर्व, मुंबई.

    Muthu Dosa Corner

    गुगल मॅपवरून साभार

    First published:
    top videos

      Tags: Food, Mumbai, Rajnikant