मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कांदा प्रश्नी न्याय मागायला गेलेल्या शेतकऱ्यांनाचं मंत्री भारती पवारांनी सुनावलं LIVE VIDEO

कांदा प्रश्नी न्याय मागायला गेलेल्या शेतकऱ्यांनाचं मंत्री भारती पवारांनी सुनावलं LIVE VIDEO

कांदा उत्पादक शेतकरी पिकवलेला कांदा खपवण्यासाठी सरकारकडे वेळोवेळी मागणी करत आहे. परंतु सरकारकडून पुरेशी मदत मिळत नाही.

कांदा उत्पादक शेतकरी पिकवलेला कांदा खपवण्यासाठी सरकारकडे वेळोवेळी मागणी करत आहे. परंतु सरकारकडून पुरेशी मदत मिळत नाही.

कांदा उत्पादक शेतकरी पिकवलेला कांदा खपवण्यासाठी सरकारकडे वेळोवेळी मागणी करत आहे. परंतु सरकारकडून पुरेशी मदत मिळत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक, 05 मार्च : मागच्या काही दिवसांपासून बाजारात नवीन कांदा येत आहे. यामुळे कांद्याचे दर अचानक पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शेतकरी पिकवलेला कांदा खपवण्यासाठी सरकारकडे वेळोवेळी मागणी करत आहे. परंतु सरकारकडून पुरेशी मदत मिळत नाही. मागच्या दोन दिवसांपासून नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जात आहे परंतु हा कांदा अत्यंत कवडीमाल भावाने विकला जात आहे. यासाठी  केंद्रीय मंत्री भारती पवार यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेराव घातला.

नाशिकमधील निफाड तालुक्यातील शिरसगावमध्ये हा प्रकार घडला. यावेळी शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडली परंतु भारती पवार यांनी ती पूर्ण न ऐकल्याने काही शेतकरी त्यांच्यावर नाराज झाले. यावर मंत्री भारती पवार म्हणाल्या की, मी नाफेडची खरेदी करण्यासाठी आग्रह केला. तुम्ही विरोध करत आहात. आजपर्यंत सरकार लाल कांदा खरेदी करत नव्हतं. आता तो आम्ही खरेदी करत आहोत.

रामदास कदम 'देवमाणूस', उद्धव ठाकरे येण्याआधी शिंदे गटाने झळकावले बॅनर

केंद्र सरकारनं पहिल्यांदा लाल कांदा खरेदी करण्याचा हा निर्णय घेतल्याचं भारती पवार म्हणाल्या. जागतिक पातळीवर जे भाव असतील त्या भावाने खरेदी करा. असं शेतकरी म्हणाले. त्यावर भारती पवार म्हणाल्या, जागतिक पातळीवर मागणी नाही. लाल कांदा हा लवकर खराब होतो. शेतकरी संघटनेनं निवेदन द्यावं की, नाफेड काही कामाचं नाही. आम्ही नाफेडची खरेदी बंद करू, असंही भारती पवार यांनी सांगितलं.

नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी भाव पाडण्यासाठीच असून सरकार याप्रश्नी चालढकल करीत असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना घेराव घातला. निर्यात वाढली म्हणतात मग शेतमालास भाव का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

...लवकरच सत्य समोर येईल, संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी फडणवीसांचं मोठं विधान

निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी मंत्री भारती पवार आल्या होत्या. त्यावेळी कांदा दरावरून त्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला. शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे यांनी शेतमालास भाव नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. शेतकरी संघटनेने लेखी द्यावे आम्ही नाफेडची खरेदी बंद करू, असे यावेळी पवार म्हणाल्या. यावरून शेतकरी नाराज झाले होते.

First published:
top videos

    Tags: Farmer, Farmer protest, Nashik, Onion, Priceonion