मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /BREAKING : छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली, वाटेतच हॉस्पिटलमध्ये पोहोचले

BREAKING : छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली, वाटेतच हॉस्पिटलमध्ये पोहोचले

छगन भुजबळ

छगन भुजबळ

ताप वाढल्याने त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची तपासणी करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक, 27 मार्च : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. येवल्याहून नाशिकला परत येत असताना अचानक भुजबळ यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे थंडी ताप वाढल्याने त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी करून त्यांना त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे.

छगन भुजबळ हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्याला गेले होते. येवल्यावरून परत येत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. ताप आणि थंडी वाढल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तातडीने वाटेत अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली. त्यानंतर त्यांना घरी जाण्यास मुभा दिली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. सध्या भुजबळ हे नाशिक मधल्या घरी पोहोचले आहे.

(आधी ठाकरे, आता राऊत.. सावरकरांवरुन राहुलवर हल्लाबोल; उद्धव सेना घेणार मोठा निर्णय?)

दरम्यान, भुजबळ हे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. 'राहुल गांधी प्रकरण याचा ओबीसीशी संबंध नाही. मोदी साहेबांनी का नाही इम्पिरिकल डेटा दिला. तुम्ही ओबीसी लोकांना का पाठिंबा दिला नाही. जे लोक बाहेर पळून गेले, ते ओबीसी नाही. देशातले सगळे विरोधी पक्ष राहुल गांधी यांना सपोर्ट करत आहे, असंही भुजबळ म्हणाले.

राऊतांवर टीका करताना संजय शिरसाटांची जीभ घसरली, नको ते बोलून बसले म्हणाले...)

'राहुल गांधी कर्नाटक मध्ये बोलले आणि केस सुरतमध्ये कशी झाली? यातील अनेक वेळा न्यायाधीश देखील बदलण्यात आले. जनतेचे कोर्ट मोठे कोर्ट असते, तिथे त्यांना न्याय मिळेल, असंही भुजबळ म्हणाले.

नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीवर छगन भुजबळ यांचा शहर पोलीस आयुक्तांना इशारा दिला. 'जे कोणी पोलीस आयुक्त आहे, त्यांना गुन्हेगारी आवरावी लागेल. नाहीतर नाशिकच्या जनतेचा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल. नाशिकच्या जनतेच्या वतीने आम्ही उठाव करू, असा इशाराही भुजबळांनी दिला.

First published:
top videos

    Tags: Nashik