नाशिक, ०1 ऑक्टोबर : नाशिकचं ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या श्री कालिका देवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे. नवरात्रोत्सवात शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. गेली दोन वर्षे कोरोनाचा कहर सुरू असल्यामुळे सर्वच उत्सवांवर बंधन घातली गेली होते. मात्र, यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरे होत असल्याने भाविकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. शहराच्या मध्यवर्ती परिसरात श्री कालिका देवीचे मंदिर आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी गैरसोय होऊ नये याकरिता भव्य मंडप उभारण्यात आला आहे. भक्त सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत.
हेही वाचा : Navratri 2022: नवरात्रीत चुकून उपवास मोडला तर काय कराल?
देवीला शंभर तोळ्याच्या दागिन्यांसह दीडशे किलो चांदीचा महिरप श्री कालिका देवी मंदिर संस्थानने या वर्षी नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी केलेली आहे. यामुळे मंदिर संस्थानचा प्रतिसाद बघता भाविकांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. संस्थानने दोन वर्षांपूर्वी श्री कालिका मातेला शंभर तोळ्याचे दागिने आणि दीडशे किलो चांदीचा महिरप बनवला आहे. तो या वर्षी उत्सव काळात देवीच्या गाभाऱ्यात शोभून दिसत असून भाविकांचे आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे संस्थानने देवीला जे शंभर तोळ्याचे दागिने बनवले आहेत. त्याचा एक कोटीचा विमा देखील काढला आहे. या वर्षी दोन कोटींचा जिवन विमा भाविकांचा देखील काढला आहे. यामुळे मंदिर संस्थानने केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वच भाविक भक्तांकडून जोरदार कौतुक होत आहे, अशी प्रतिक्रिया श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांनी दिली आहे. यात्रेला भाविकांचा चांगला प्रतिसाद यंदा भाविकांचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे श्री कालिका देवीची यात्रा चांगली भरली आहे. मुंबई नाका ते गडकरी सिग्नलरोड पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. यामध्ये सर्व लहान मोठी दुकान पाळणे लागले आहेत. भाविक मोठ्या यात्रेचा चांगला आनंद घेत आहेत. दोन वर्षांनंतर श्री कालिका देवीचे मंदिर उखडले आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. कोरोना सारखं भयंकर संकट कधीच न येवो अस देखील देवीला साकड घातल अशी प्रतिक्रिया भाविक शंकर कनकुसे यांनी दिली.
श्री कालिका देवी पत्ता : नाशिक शहरातील गडकरी चौकाच्या अगदी लगत श्री कालिका देवी मंदिर आहे.