नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगा, असं आपल्याला नेहमीच सांगितलं जातं. कारण जर थोडसंही दुर्लक्ष झालं तरी मोठा अपघात होऊ शकतो. मात्र फोटो आणि व्हिडीओ काढण्याच्या नादात अनेकांसोबत छोटा मोठा अपघात होत असतो. अनेकजण यातून थोडक्यात बचावतात. खास करुन रेल्वे रुळावर असे अपघात होताना दिसतात. बऱ्याचदा लोक चालू लोकलमधून पडतात तर काहीजण रेल्वेच्या दरवाजा, खिडकीतून काहीतरी हटके करण्याच्या नादात अपघाताचा बळी ठरतात. असाच काहीसा आणखी एक प्रकार समोर आला असून याचा व्हिडीओही समोर आलाय. एक तरुणी रेल्वेच्या खिडकीतून तोंड बाहेर काढून व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करते. मात्र तेवढ्यात अजून एक रेल्वे शेजारून भरधाव वेगाने येत असते. अगदी काही सेकंदांच्या आत तरुणी खिडकीतून आत येते आणि मोठा अपघात टळतो. क्षणभराचा उशीर झाला असता तर तरुणीसोबत भयंकर घडलं असतं.
Watch as stranger narrowly dodged incoming train 😳 pic.twitter.com/GOC9O7SZuN
— OddIy Terrifying (@OTerrifying) February 23, 2023
@OTerrifying या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याशिवाय व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येताना दिसत आहे. या व्हिडिओला 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, असे अपघात होता होता थोडक्यात बचावल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रेल्वे स्टेशन आणि चालू रेल्वेमध्ये सर्वाधिक अपघात घडतात. त्यामुळे प्रवासादरम्यान सावधानता खूप गरजेची आहे. त्यामुळे रेल्वे किंवा अजून कुठेही प्रवासादरम्यान मोबाईल काळजीपूर्वक वापरणे हेही खूप महत्त्वाचं आहे. अपघात कधीही आणि कुठेही आणि कोणासोबतही होऊ शकतो त्यामुळे सावधगिरी बाळगा.