जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिक : जन्मदात्या आईनेच मुलाच्या खुनाची दिली सुपारी; 15 हजार रुपयात लेकाला संपवलं

नाशिक : जन्मदात्या आईनेच मुलाच्या खुनाची दिली सुपारी; 15 हजार रुपयात लेकाला संपवलं

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

नाशिकमधील या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 8 जुलै : जन्मदात्या आईने आपल्या मुलाच्या खुनाची सुपारी देऊन त्याची निर्घृणपणे हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील (Nashik Crime News) नांदगावच्या ढेकु येथे घडली आहे. जनार्धन पेंढारे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. जनार्धन हा मनोरुग्ण सारखा वागत होता. इतकच नाही तर तो नेहमी आई-वडिलांना मारहाण करत असे. त्याच्या त्रासाला कंटाळून आई जनाबाई पेंढारे हिने टोकाचे पाऊल उचलत गावातच राहणाऱ्या समाधान भड याला 15 हजार रुपयांची सुपारी दिली होती. जनार्धन रात्री झोपलेला असतांना त्याच्या डोक्यावर वार करण्यात आला. आणि त्याचा मृतदेह गोणीत भरून गावाजवळ असलेल्या विहिरीत फेकण्यात आला होता. गोणी पाण्यावर तरंगत असल्याचे पाहून ग्रामस्थांना संशय आला आणि त्यांनी गोणी बाहेर काढल्यावर त्यात जनार्धनचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर आईने सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली.  पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपीना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. कोणतीही आई आपल्या मुलाच्या हत्येची सुपारी कशी काय देऊ शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात