Home /News /maharashtra /

घरी यायचं राहून गेलं, 11 वर्षांच्या मुलीसह तिघांचा नदीच्या पुरात बुडून दुर्दैवी मृत्यू

घरी यायचं राहून गेलं, 11 वर्षांच्या मुलीसह तिघांचा नदीच्या पुरात बुडून दुर्दैवी मृत्यू

 शेतमजूर शेती काम आटपून घराकडे निघाले होते. रस्तात असलेल्या लेंडी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात 3 जणांचा मृत्यू झाला

शेतमजूर शेती काम आटपून घराकडे निघाले होते. रस्तात असलेल्या लेंडी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात 3 जणांचा मृत्यू झाला

शेतमजूर शेती काम आटपून घराकडे निघाले होते. रस्तात असलेल्या लेंडी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात 3 जणांचा मृत्यू झाला

नांदगाव, २५ जून : मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला आलेल्या पुरात दोन मुली आणि एक महिला वाहून गेल्याची दुर्दैवी घटना नाशिक (nashik) जिल्ह्यातील नांदगावच्या जातेगाव येथे घडली आहे.वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले तर एकाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिना भैरव,साक्षी सोनवणे आणि पुजा सोनवणे अशी तिघांची नाव आहे. तिघीही शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या घरी परत जात असताना लेंडी नदीला आलेल्या पुरात तिघेही वाहून गेल्या होत्या. नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. नदी नाले तुटुंब भरू वाहण्यास सुरुवात झाली आहे. जातेगाव शिवारात झालेल्या भरगोस पावसाने जातेगाव शिवारमध्ये औरंगाबाद येथील शेतमजूर शेती काम आटपून घराकडे निघाले होते. रस्तात असलेल्या लेंडी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात 3 जणांचा मृत्यू झाला. शेतमजूर मिनाबाई दिलीप बहिरव (वय 45),आडगाव,साक्षी अनिल सोनवणे (वय11) आडगाव मयत झाले असून यांचे मृतदेह सापडले आहे. तर पूजा दिनकर सोनवणे (वय 15) हिचा शोध सुरू आहे. (द्रौपदी मुर्मूवरील 'ते' ट्विट राम गोपाल वर्मांना भोवलं; पोलिसांत पोहोचलं प्रकरण) आर्द्रा नक्षत्राच्या सुरवातीला परिसरात जोरदार पाऊस झाला.दिनांक 24/6 वार शुक्रवार रोजी डोंगर परिसर आणि आडगाव ता कन्नड या भागाकडे मुसळधार पाऊस झाल्याने काही क्षणात लेंडी नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी मागील वर्षी ही परिसरात बैलगाडी पलटी होऊन बैल दगावले आहे. बोलठाणासह परिसरातील या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत कार्य करत सर्वतोपरी सहकार्य केले. यावेळी पोलीस नाईक अनिल गांगुर्डे यांनी याबाबत माहिती दिली. सापडलेले मृत देह शवविच्छेदनासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालय पाठवले आहे. तर बेपत्ता असलेल्या पूजा दिनकर सोनवणे हीच तपास सुरू आहे. यावेळी महसूल विभागाच्या वतीने बोलठाण येथील तलाठी जे एम मलदोडे उपस्थित होते.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या