Home /News /maharashtra /

Nashik : श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी जाण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा!

Nashik : श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी जाण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा!

श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी मोठी गर्दी होते.

श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी मोठी गर्दी होते.

श्रावण महिन्यात हजारो भाविक त्रंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा (Bramhagiri Trimbkeshwar Parikrama) मारण्यासाठी येत असतात.

    नाशिक 25 जुलै : हिंदू धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला 28 जुलैपासून सुरूवात होत आहे. या महिन्यात नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळ असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन तयारीला लागलं आहे. श्रावण महिन्यात हजारो भाविक त्रंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी  प्रदक्षिणा (Bramhagiri Trimbkeshwar Parikrama) मारण्यासाठी येत असतात.गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे भाविकांना प्रदक्षिणेस बंदी घालण्यात आली होती.त्यामुळे या वर्षी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काय आहे प्रदक्षिणेचं महत्व ? श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला आणि भागवत धर्माची स्थापना झाल्याची अख्यायिका आहे. अशा पुराणकालापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलीत आहे. पुण्यप्राप्तीसाठी, तर कधी पापक्षालनासाठी प्रदक्षिणा झाल्या आहेत. इतिहासात शिक्षा म्हणून प्रदक्षिणा करण्यास सांगितले आहे. कशी आहे परिवहन महामंडळाची व्यवस्था? श्रावण महिन्यात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या भाविकांच्या सोयीासाठी प्रशासनाकडून खास व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी  जवळपास 300 जादा बसेसच नियोजन करण्यात आले आहे.1 ऑगस्टला पहिला सोमवार आहे.8 ऑगस्टला दुसरा सोमवार आहे.तर तिसरा सोमवार हा 15 ऑगस्टला आहे.गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे भाविकांना प्रदक्षिणा मारता आली नाहीये.त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात भाविक प्रदक्षिणेसाठी दर्शनासाठी दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनानं  पूर्व तयारी केली असल्याची माहिती प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली आहे. जमिनीवर सरपटत पूर्ण केली सप्तपदी, दिव्यांग जोडप्याच्या लग्नाची गोष्ट वाचून डोळ्यात येईल पाणी वैद्यकीय व्यवस्थाही सज्ज ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्ग हा जवळपास 20 किलोमीटरचा मार्ग आहे.या मार्गात फार अडथळे नाहीत. भाविकांना चालण्यासाठी चांगला मार्ग आहे.अनेक भाविक प्रदशिक्षाच्या दरम्यान पादत्राणे घालत नाही यापूर्वी प्रदक्षिणा मार्ग हा अवघड होता मात्र आता रस्ते बनवले गेल्यामुळे जास्त त्रास होत नाही.मात्र मार्गात भाविकांना जर वैद्यकीय मदतीची गरज पडली तर,त्यांना तात्काळ मदत मिळावी या करिता पहीने, सामुंडी सापगाव या मार्गावर वैद्यकीय पथक असणार आहेत.तीन सुसज्ज अशा रुग्णवाहिका देखील मदतीसाठी तयार आहेत. गूगल मॅपवरून सभार गूगल मॅपवरून सभार पार्किंग व्यवस्था कशी असेल ? त्रंबकेश्वर शहराचा भौगोलिक आकार हा खूप मोठा नाही. त्यामुळे जास्त भाविक आल्यास त्रंबकेश्वरमध्ये खूप गर्दी होत असते.आणि प्रदक्षिणा करणाऱ्या भाविकांना या वाहतुकीचा अडथळा निर्माण होत असतो.त्यामुळे पार्किंग व्यवस्था ही शहराच्या बाहेर करण्यात आली आहे.नाशिककडून जाणाऱ्या खाजगी वाहनांसाठी खंबाळे येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे तर, गिरणारे मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी तळवाडे येथे पार्किंग करण्यात आली आहे. जव्हार मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी पिंपळद जवळ पार्किंग व्यवस्था केली गेली आहे.घोटी मार्गे येणाऱ्या वाहनांना सामुंडी जवळ पार्किंग व्यवस्था केली गेली आहे.फक्त महामंडळाच्या सरकारी बस या जव्हारफाटा बसस्थानका पर्यंत जाऊ शकतील,खाजगी वाहनातून आलेल्या भाविकांना आपली वाहन पार्क करून बसचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. Nashik Ramsetu : ऐतिहासिक 'रामसेतू'वरून नाशिकमध्ये 'महाभारत', नागरिक आणि प्रशासनमध्ये संघर्षाची ठिणगी मंदिर प्रशासन सज्ज त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने येणाऱ्या भाविकांच्या दर्शनाची चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली आहे.दर्शनरांगेसाठी भव्य असा मंडप नुकताच गेल्या काही दिवसांपापूर्वी उभारण्यात आला आहे.श्रावण महिन्यात आलेल्या सर्व भाविकांना दर्शन मिळण्यासाठी त्रंबकराजांचे मंदिर हे पहाटे 4 ते रात्री 9 वाजे पर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.तर संत निवृत्तीनाथ महाराजांचे मंदिर देखील याच वेळेत खुले राहील.तसेच भाविकांना मंदिर परिसरात देखील वैद्यकीय व्यवस्था पुरवली जाणार आहे.अशी माहिती त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी दिली आहे.
    First published:

    Tags: Nashik, Shravan

    पुढील बातम्या