नाशिक, 08 फेब्रुवारी : नाशिक रेल्वेस्थानकावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक प्रवाशी रेल्वेत चढत असताना अचानक तोल गेल्याने रेल्वे खाली जात असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान या प्रवाशाचा आरपीएफच्या कर्मचाऱ्याने जीव वाचवल्याने सगळीकडे कौतुक होत आहे. डोळ्याची पापणी लवते ना लवते प्रवासी रेल्वे खाली जात असताना त्या प्रवाश्याचा जीव वाचवण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
रेल्वेत चढत असताना तोल गेल्याने प्रवासी प्लॅटफॉर्मवर फरफटत असल्याचे लक्षात येताच आरपीएफ जवानाने खबरदारी घेत जीव वाचवला आहे. सदर घटनेचे थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. प्लॅटफॉर्म वर उभ्या असलेल्या पवन एक्सप्रेसमध्ये प्रवाश्याने आपले सामान टाकत असताना रेल्वे सुरू झाली.
नाशिक - रेल्वेत चढत असताना तोल गेल्याने प्रवासी प्लॅटफॉर्मवर फरफटत असल्याचे लक्षात येताच आरपीएफ जवानाने खबरदारी घेत वाचविला जीव pic.twitter.com/diUisKpZMp
— News18Lokmat (@News18lokmat) February 8, 2023
हे ही वाचा : महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं
धावपळीत प्रवासी चढला मात्र तोल जात असल्याने तो पडणार असल्याचे लक्षात येताच आरपीएफ पोलिसांची सावधगिरी बाळगत त्याला ओढले.
नाशिक आता हायस्पीड रेल्वे
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला रविवारी (ता. ५) केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. सविस्तर प्रकल्प अहवालातील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश श्री. वैष्णव यांनी दिले असून, प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयातील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, की नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी केंद्र सरकारसमवेत २०१७-१८ मध्ये करार झाला होता. त्यानुसार प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सादर करण्यात आला होता. यापूर्वी वैष्णव यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यात सुधारणा सूचवण्यात आल्या होत्या. त्या सुधारणा करून सविस्तर प्रकल्प अहवाल वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला.
हे ही वाचा : डोक्यावर पदर घेऊन महिलांचा हटके डान्स, चक्क जमिनीवर लोळण घेत लुटला आनंद
बैठकीसाठी रेल्वेचे अधिकारी, महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल, अर्थ सचिव मनोज सौनिक, पायाभूत सुविधा प्रकल्प वॉररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv footage, Railway, Video viral