मुंबई, 7 फेब्रुवारी : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओजमध्ये जास्त व्हिडिओज डान्सचे असतात. लोकांना डान्सचे व्हिडिओ पाहायला व तसे डान्स करायलाही खूप आवडतं. खरं तर अनेकांना डान्स आवडतो; मात्र काही जण बुजऱ्या स्वभावामुळे मोकळेपणानं आपली आवड व्यक्त करत नाहीत. अशांसाठीही सोशल मीडियाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ रील्स, शॉर्ट व्हिडिओ यांच्या माध्यमातून पाहता येऊ शकतात.
व्यावसायिक डान्सचे व्हिडिओ तर लोकप्रिय असतातच; पण लग्नातले, वरातीतले किंवा एखाद्या समारंभातले व्हिडिओजही खूप व्हायरल होतात. लोक नाचण्याचा मनमुराद आनंद लुटत असल्याचं अशा व्हिडिओजमधून दिसतं. आपण जमिनीवर लोळतोय याचंही भान काहींना राहत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय. त्यात ढोलाच्या तालावर काही महिला चक्क जमिनीवर लोळून डान्स करतायत. एबीपी लाइव्हने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं
काही डान्स व्हिडिओ खूप मनोरंजन करतात. असाच एक व्हिडिओ सध्या लोकप्रिय ठरतोय. या व्हिडिओत डान्स करणाऱ्या दोन महिला ढोलाच्या तालावर डान्स करतायत; पण हा साधा डान्स नसून त्या चक्क जमिनीवर लोळत डान्स करताहेत. व्हिडिओमध्ये सुरुवातीला 2 महिला जमिनीवर झोपून डान्स करताना दिसतात. त्यानंतर एक महिला येऊन डान्सचं कौशल्य दाखवते.
त्यानंतर तिघीही उठून पुन्हा डान्स करायला लागतात. इतर अनेक महिला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या दिसत आहेत; मात्र डान्स करणाऱ्या महिलांचा उत्साह पाहून आजूबाजूच्यांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य दिसतंय. अगदी ढोल वाजवणारेही आश्चर्य लपवू शकलेले नाहीत. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत 54 हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. त्याला व्ह्यूजही लाखो मिळाले आहेत.
काही जण इतकं मनमोकळं नाचतात की, समोरच्याला काय वाटेल याची जराही पर्वा करत नाहीत. या व्हिडिओमधल्या महिलाही उपस्थितांची पर्वा न करता डान्स करत आहेत. तिथे असलेल्या इतर महिलांना व ढोल वादकांनाही त्यांच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव लपवता आलेले नाहीत. डान्स करणाऱ्या महिला ढोल वाजताना इतक्या रंगून गेल्या आहेत, की त्या बिनधास्तपणे जमिनीवर लोळत डान्स करत आहेत.
विवाहबाह्य संबधातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहात का?
असे व्हिडिओ खूप मनोरंजन करतात. त्यामुळे सोशल मीडियावर ते खूप जास्त व्हायरलही होतात. या व्हिडिओवर लोकांनी अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यात अनेकांनी महिलांच्या कर्तृत्वाचं कौतुक केलंय. पुरुषांपेक्षा स्त्रिया कशातच कमी नाहीत, असंही अनेकांनी म्हटलंय.
View this post on Instagram
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Video viral, Viral