मुंबई, 07 फेब्रुवारी : सोनं हा भारतीयांच्या आवडीचा विषय आहे. काही लोक याकडे इन्वेस्टमेंट म्हणून पाहातात. तर काही लोक लग्नकार्यात या महत्व देतात. असं म्हणतात की सोनं सौंदर्य वाढवण्यासोबतच शरीरासाठीही फायदेशीर आहे. त्याचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले गेले आहेत.
सोन्याचे दागिने म्हणून लोक अंगठी, कडे, गळ्यातलं, मंगळसूत्र, कानातले सारख्या गोष्टी बनवतात. पण सोन्याचे पैंजण मात्र कमी प्रमाणात घातले जातात. असं का? तुम्ही पाहिलं असेल की चांदीचेच पैंजण लोक घालतात. पण मग सोन्याचे पैंजण का घातले जात नाहीत?
हे ही पाहा : विवाहबाह्य संबधातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहात का?
खरंतर याचा संबंध ज्योतिशशास्त्राशी असल्याचं सांगितलं जातं. असे मानले जाते की सोन्याचे दागिने तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात. पायात सोन्याचे पैंजण न घालण्यामागील ज्योतिषीय कारण आहे त्यामुळे होणारे नुकसान.
सोन्याला लक्ष्मीचे रूप मानले जाते
हिंदू धर्मग्रंथानुसार सोन्याला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे त्याला कमरेच्या वरतीच घातले जाते. जर सोन्याला कमरेच्या खाली म्हणजे पायात घातल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा अपमान होतो असं म्हणतात. त्यामुळे ते पायात घालू नये असा सल्ला दिला जातो.
आता यामागचं वैज्ञानिक कारण काय? जाणून घेऊ
पायात सोन्याचे दागिने न घालण्याचे आणखी एक कारण म्हणजे सोन्याचे दागिने पायात उष्णता वाढवतात. कमरेच्या वर सोन्याचे दागिने आणि कमरेच्या खाली चांदीचे दागिने घातल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते. शरीराच्या सर्व भागात फक्त सोन्याचे दागिने घातल्यास शरीराचे तापमान वाढल्याने अनेक आजार होऊ शकतात.
त्यामुळेच पायात चांदीच्या धातूपासून बनविलेले अँकलेट किंवा पैंजण घालावे. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहाते. चांदीचा धातू शरीराला थंड ठेवतो.
तसेच शरीरात चांदी धारण केल्याने चंद्राची स्थिती चांगली राहून शरीराला ऊर्जा मिळते. कमरेला सोन्याचे आणि पायात चांदीचे दागिने धारण केल्याने डोक्यापासून पायापर्यंत आणि पायापासून डोक्यापर्यंत ऊर्जा प्रवाहित होते आणि अनेक रोगांपासून मुक्ती मिळते.
पायाचा जो भाग पायघोळ घातला जातो तो भाग ज्योतिषशास्त्रात केतूचे स्थान मानला जातो. असे मानले जाते की केतूला नेहमी थंड ठेवणे आवश्यक आहे. केतूमध्ये शीतलता नसेल तर त्याचा नकारात्मक प्रभाव शरीरावर पडू लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold and silver, Lifestyle, Silver, Viral