जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाशिककरांसाठी मोठी बातमी, तब्बल 6 हजार 800 कोटींचा प्रोजेक्ट मंजूर, रोजगारही वाढणार

नाशिककरांसाठी मोठी बातमी, तब्बल 6 हजार 800 कोटींचा प्रोजेक्ट मंजूर, रोजगारही वाढणार

नाशिककरांसाठी मोठी बातमी, तब्बल 6 हजार 800 कोटींचा प्रोजेक्ट मंजूर, रोजगारही वाढणार

ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमीटेड (एच.ए.एल.) कंपनीला विमानांच्या निर्मितीसाठी 6 हजार 828 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

  • -MIN READ Local18 Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 30 मार्च : ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमीटेड (एच.ए.एल.) कंपनीला विमानांच्या निर्मितीसाठी 6 हजार 828 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्याबरोबरच एच.ए.एल. कंपनीत एचटीटी 40 मॉडेलच्या विशेष ट्रेनर विमानांची निर्मिती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा निधी मंजूर केला आहे. नाशिक येथील ओझर येथे स्थित एच.ए.एल. ला 70 एचटीटी च्या 40 एअरक्रॉफ्टची निर्मिती करण्यासाठी 6 हजार 828 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

जाहिरात
‘राहुल गांधीच भाजपाला जिंकवून देणार’, Rising India मध्ये केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

यासाठी एच.ए.एल.ओझर येथील अखंड कनेक्टिव्हीटी व तेथील उपलब्ध मनुष्य बळाची संख्या लक्षात घेता घेऊन हा विचार केला आहे. तसेच विविध प्रकारची यशस्वी विमाने तयार करण्याचा एचएएल प्रशासनाचा अनुभवाच्या जोरावर हे काम एचएएल कंपनीला मिळावे यासाठी संरक्षणमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

त्याची दखल घेत व एच.ए.एल. प्रशासनाकडे गेल्या काही वर्षांपासून कामाचा कमी झालेला ओघ विचारात घेतला गेला. केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी एच.ए.एल. ला 60 विमानांची निर्मिती करण्यासाठी उत्पादनास मंजूरी दिल्याची माहिती लेखी पत्राद्वारे दिली आहे. अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

न्यू इंडिया 2022 रणनिती अंतर्गत भारताने सर्व क्षेत्राचा समतोल विकास करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यात संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एच.ए.एल. ही प्रतिष्ठीत भारतीय सरकारी मालकीची एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी असल्याचा नाशिकला अभिमान आहे. 1964 पासून एच.ए.एल. देशाच्या संरक्षण उत्पादनात सक्रीय सहभाग घेत आहे.

जाहिरात

केंद्र सरकारच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांच्या दृष्टीने देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी नाशिक एच.ए.एल. कंपनीस या विमान उत्पादनाचे कंत्राट दिल्यास नाशिक विभागासाठी सन्मानाची बाब ठरेल, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कळविले आहे.एच.ए.एल. नाशिक कंपनीत यापूर्वी अनेक लढाऊ विमाने व इतर प्रकारच्या विमानाची निर्मिती करण्यात आली आहे.  

नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव, अमित शाह यांचा सर्वात मोठा खुलासा
जाहिरात

त्यामुळे नाशिकची एच.ए.एल. विमान बनविणारी कंपनी नेहमीच नव्या प्रयोगशील विमानांच्या निर्मितीसाठी सज्ज असते. वायुदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले एचटीटी 40 जातीचे ट्रेनर विशेष विमाने तयार करण्याचे काम एच.ए.एल. देण्याचा निर्णय संरक्षण विमानाने घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18 , nashik
  • First Published :
जाहिरात
जाहिरात