मराठी बातम्या /बातम्या /देश /'राहुल गांधीच भाजपाला जिंकवून देणार', Rising India मध्ये केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

'राहुल गांधीच भाजपाला जिंकवून देणार', Rising India मध्ये केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी नेटवर्क 18 च्या रायझिंग इंडिया या कार्यक्रमात राहुल गांधींवर भाष्य केलं आहे.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी नेटवर्क 18 च्या रायझिंग इंडिया या कार्यक्रमात राहुल गांधींवर भाष्य केलं आहे.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी नेटवर्क 18 च्या रायझिंग इंडिया या कार्यक्रमात राहुल गांधींवर भाष्य केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 29 मार्च : नेटवर्क 18 च्या रायझिंग इंडिया या कार्यक्रमात अनेक केंद्रीय मंत्री सहभागी झाले. रायझिंग इंडियाच्या मंचावर त्यांनी देशातील प्रकल्प, योजना, कायदे याबाबत बरीच माहिती दिली. या मंत्र्यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे. तर एका केंद्रीय मंत्र्याने मोठं विधान केलं आहे. राहुल गांधीच भाजपाला निवडणूक जिंकवून देणार, असं त्यांनी म्हटलं आहे.  केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांचं हे विधान आहे.

राहुल गांधींवरील कारवाईबाबत मांडविया यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले. राहुल गांधी आपल्या अपयशासाठी सरकारला दोषी ठरवतात त्यांना वाटतं, सर्वकाही पंतप्रधान मोदी आणि अमित शहा करत आहेत.  राहुल गांधी यांना शिक्षा देण्यात सरकारची कोणतीही भूमिका नाही. तपास यंत्रणा आपल्या काम करतात. त्यांना कोर्टाने शिक्षा दिली आहे.

" isDesktop="true" id="857877" >

कर्नाटकात भाजपचंच सरकार येणार. राहुल गांधी भाजपाला निवडणूक जिंकवून देणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

'हो, यासाठी PM मोदीच जबाबदार', केंद्रीय मंत्री पीयुष गोयल पंतप्रधानांबाबत काय म्हणाले?

अचानक हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यू प्रकरणांवरही केंद्रीय आरोग्यमंत्री बोलले. याप्रकरणी आयसीएमआर तपास करत आहे. दोन महिन्यांत याचा रिपोर्ट येईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

रायझिंग इंडिया समिट 2023

न्यूज 18 नेटवर्क आणि पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (सायरस पूनावाला ग्रुप) ने 'रायझिंग इंडिया समिट 2023' या दोन दिवसीय कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं. दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेसमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यंदाचा विषय आहे 'द हीरोज ऑफ रायझिंग इंडिया'. ज्याचा उद्देश सर्वसामान्य भारतीयांच्या असामान्य कामगिरीवर प्रकाश टाकणं हा आहे. यादरम्यान अशा वीरांचा गौरव करण्यात आला ज्यांनी आपल्या अनोख्या उपायांनी तळागाळात सुधारणा करून लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडला.

संमेलनाचा पहिला दिवस शानदार होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिवहन, रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. त्यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.

First published:
top videos

    Tags: India