Home /News /maharashtra /

Nashik : छंद माझा वेगळा, दुसऱ्याची सकाळ गोड करण्यासाठी झटणारा अवलिया

Nashik : छंद माझा वेगळा, दुसऱ्याची सकाळ गोड करण्यासाठी झटणारा अवलिया

नाशिककरांची सकाळ प्रसन्न करण्याचा बच्छाव यांचा प्रयत्न आहे.

नाशिककरांची सकाळ प्रसन्न करण्याचा बच्छाव यांचा प्रयत्न आहे.

Nashik : नाशिककरांच्या आनंदासाठी भल्या पहाटे उठून हा अवलिया बासरी वाजवतो.त्याच्या या अनोख्या उपक्रमाला नाशिककरांचीही मोठी दाद मिळत आहे.

    नाशिक 25 जुलै ; आतापर्यंत आपण अनेक वेगवेगळे छंद (Hobby)जोपासले असतील किंवा हटके छंद जोपासणारे देखील बघितले असतील. नाशिकच्या सुनील बच्छाव (Sunil Bachhav) या अवलियाचा छंद देखील जरा हटके आहे. त्यांना आपल्या बासरी मधून सुमधुर आवाज दुसऱ्यांना ऐकवण्याचा, आणि त्यांचं मनोरंजन करण्याचा छंद जडला आहे. त्यामुळे सध्या नाशिक शहरात सुनील हे चर्चेचा विषय बनले आहेत. सुनील बच्छाव हे एका खाजगी संस्थेत काम करतात. आपल काम सांभाळून ते छंद जोपासतात. वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांना बासरी वाजवण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बासरी आहेत. दुसऱ्यांना आनंद देण्यातच आपला आनंद असल्याचं त्यांचं मत आहे. त्यामुळे आपल्या बासरी वादनातून इतरांना कसा आनंद मिळेल, याचा विचार ते सतत करत असतात. त्यामुळे नाशिक शहरात गेल्या चार पाच वर्षांपासून त्यांनी नाशिककरांसाठी एक हटके प्रयोग सुरू केला आहे. बच्छाव पहाटे पाच ते सात हा दोन तासांचा वेळ नागरिकांसाठी देतात म्हणजे नागरिक जिथं वॉकिंग करतात. त्या ठिकाणी जाऊन ते सुमधुर आवाजात बासरी वाजवत मनोरंजन करत नागरिकांची सकाळ गोड करतात. त्यांचा हा गेल्या पाच वर्षांपासूनचा नित्यक्रम आहे. दररोज शहरातील विविध भाग निवडायचे,आणि त्या ठिकाणी जाऊन बासरी वाजवायची,यामुळे नागरिकांचा देखील सकाळच्या वातावरणात उत्साह वाढतो. त्यांच्या या उपक्रमाला अनेक नागरिकांची चांगली साथ मिळत आहे. नागरिक त्यांचं तोंडभरून कौतुक करतात. बासरीची सुमधुर धून ऐकत नागरिक आपला व्यायाम पूर्ण करतात. फक्त सकाळीच नाही तर सायंकाळी देखील जसा वेळ मिळेल तसं ते मनोरंजन करतात. Nashik : शेकडो गायींना जीवदान देणारे नाशिकचे पुरुषोत्तम, 9 वर्षांपासून सुरू आहे कार्य या ठिकाणी कानी पडते बासरीची धून नाशिक शहरातील  पांडवलेणी,बालाजी मंदिर,गोल्फ क्लब मैदान,कृषीनगर जॉगिंग ट्रॅक,इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, शिक्रेवाडी नाशिक रोड मैदान,तपोवन,पंचवटी,सातपूर जॉगिंग ट्रॅक,आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक, गांगापूर रोड या भागातील नागरिकांची सकाळ गोड व्हावी म्हणून बच्छाव झटत आहेत. शहरातील ज्या भागात नागरिक सकाळी मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. त्या भागात मनोरंजन केले जाते. नाशिककरांना आता त्यांच्या बासरीची सवय झाली आहे. त्यामुळे अनेकजण  त्यांना आपल्या भागात आवर्जून बोलवतात. श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी जाण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा! 'दुसऱ्यांना आनंद देण्यातच आनंद' 'माणूस स्वतः साठी तर जगतोच मात्र इतरांना आनंद कसा देता येईल,त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कस निर्माण होईल, त्यांना प्रसन्नता कशी वाटेल, यात मला आनंद आहे. त्यामुळे भल्या सकाळी उठून नागरिक ज्या ठिकाणी वॉकिंग करतात. त्या ठिकाणी जाऊन बासरी वाजवतो. त्यांचं मनोरंजन करतो यामुळे त्यांची सकाळ गोड जाते. त्यांना असणार टेन्शन दूर होतं,' हाच माझा या उपक्रमागील हेतू आहे. माझ्या या उपक्रमाला नागरिकांनी देखील चांगली साथ दिलीय, अशी भावना बच्छाव यांनी Local18 शी बोलताना व्यक्त केली आहे. नाशिकरांना काय वाटतं? नाशिककर देखील बच्छाव यांच्या अनोख्या उपक्रमाला दाद देत आहेत. 'बासरीचे सूर कानी पडताच प्रसन्न वाटतं,उत्साह वाढतो, आता सुनील यांच्या गोड बासरीची सवय झाली आहे. ते स्वर कानी पडल्याशिवाय आमच्या ही दिवसाची सुरुवात चांगली होत नाही. त्यांचा हा उपक्रम खरच वाखाण्याजोगा आहे. ते अगदी नियमितपणे हा छंद जोपासतात.गोल्फ क्लब मैदानावर सकाळ,संध्याकाळ अनेक नागरिक वॉकिंगसाठी येत असतात. सर्वानाच सुनील यांच्या सुमधुर बासरी वादनाची ओढ असते, अशी माहिती मॉर्निंग वॉकला येणारे नाशिककर किरण बोरसे यांनी दिली आहे.
    First published:

    Tags: Hobby, Nashik

    पुढील बातम्या