Home /News /maharashtra /

Nashik : शेकडो गायींना जीवदान देणारे नाशिकचे पुरुषोत्तम, 9 वर्षांपासून सुरू आहे कार्य

Nashik : शेकडो गायींना जीवदान देणारे नाशिकचे पुरुषोत्तम, 9 वर्षांपासून सुरू आहे कार्य

पुरुषोत्तम आव्हा़ड यांनी शेकडो गायींना जीवदान दिले आहे.

पुरुषोत्तम आव्हा़ड यांनी शेकडो गायींना जीवदान दिले आहे.

नाशिमधील गायींची परिस्थिती पाहून पुरूषोत्तम आव्हाड (Purishottam Aavhad) व्यथित झाले. त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचण्याचा निर्णय घेतला.

    नाशिक 25 जुलै :  अनेक शहरांमध्ये भाकड पशूंचा प्रश्न मोठा आहे. शहरातील रस्त्यांवर हे प्राणी फिरत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर वाहनांशी धडक झाल्यानं हे प्राणी देखील दगावतात. हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या गायींची (Cow) अवस्था देखील वेगळी नाही. नाशिमधील गायींची परिस्थिती पाहून पुरूषोत्तम आव्हाड (Purishottam Aavhad) हे तरूण व्यथित झाले. त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचण्याचा निर्णय घेतला. आता गेल्या 9 वर्षांपासून 'गोमातेची सेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीद घेऊन त्यांनी शेकडो गायींना जीवदान दिले आहे. कशी मिळाली प्रेरणा? आव्हाड यांनी मंगलरूप गोवत्स सेवा ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी ही गोशाळा ही सुरू करण्यात आली आहे. शहरात भाकड गायींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.त्या गायी रस्त्यावर फिरत असतात.त्यांना चारा पाणी मिळत नाही.रस्त्यावर भटकत फिरत असताना वाहन अशा गायींना बऱ्याच वेळा धडक देतात, रात्रीच्या वेळी अपघाताचं प्रमाण जास्त असतं,अपघात झाला की वाहन चालक त्या गायींना टाकून पळून जातात. त्यामध्ये अनेकदा गायींचा मृत्यू देखील होतो,मात्र अशाच एका घटनेने पुरुषोत्तम आव्हाड यांनी आपलं आयुष्य गोमातेची सेवा करण्यात घालवण्याचे ठरवले. आव्हाड यांनी समाजसेवा करणारी तरुण मुल शोधून एक ग्रुप तयार केला आहे.जवळपास चाळीस तरुण या ग्रुपमध्ये सहभागी आहेत. प्राण्यांवर हल्ले होतात किंवा त्यांचे अपघात होतात त्या ठिकाणी दाखल होऊन त्यांची टीम मदत करते. जखमी गायींवर त्यांच्या गोशाळेत उपचार केला जातो. आतापर्यंत त्यांनी असंख्य गायींना मृत्यूच्या दाढेतून वाचवलं आहे. Nashik : श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी जाण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा! हिंदू धर्मात गायीचे महत्त्व काय ? हिंदू धर्मात गायीला खूप महत्व आहे.गायीला देवाचा दर्जा दिला आहे.  मानल जात,हिंदू धर्मात गायीला मातृदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे, असे मानले जाते की गायीमध्ये 33 कोटी देवी-देवता वास करतात. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीने गायीची सेवा केली पाहिजे. गायीची सेवा करणारा पुण्याचा भागीदार होतो. मन, वाणी, कर्म आणि शरीर यांची शुद्धता केवळ गाईच्या सेवेनेच शक्य आहे.असं म्हंटलं जातं. भाकड आणि आजारी गायींची सेवा नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी गोशाळा आहेत.मात्र त्या गोशाळेमध्ये चांगल्या गायी आहेत.मात्र ज्या गायी भाकड आहेत,आजारी आहेत.अपघातग्रस्त आहेत.ज्यांना चालता येत नाही,ज्यांची कोणी चारा पाण्याची सोय करत नाही.अशा गायींना कोणी वाली नसते.त्यामुळे अशा गायींची सेवा होण्याकरिता मंगलरुप गोशाळेची निर्मिती करण्यात आली आहे.ही गोशाळा रामशेज किल्ल्याचा पायथ्याशी आहे.इतर देखील प्राण्यांना अश्रा दिला जातो त्यांची ही सेवा केली जाते.चाळीस पन्नास भाकड गायी या ठिकाणी आहेत तसेच इतर देखील प्राणी आहेत.याचा खर्च ते स्वतः करतात कोणी मदत दिली तर ते घेतात. गूगल मॅपवरून सभार गूगल मॅपवरून सभार इथं करा संपर्क शहरात किंवा शहराच्या बाहेर,ग्रामीण भागात बेवारस गायी,जखमी किंवा वयोवृध्द अवस्थेत आढळल्यास पुरुषोत्तम आव्हाड यांना संपर्क करा,त्यांचा फोन नंबर आहे.9028175817 या नंबरवर संपर्क करून माहिती द्या..तात्काळ मदत मिळेल,मंगलरुप गोवत्स सेवा ट्रस्ट (गोशाळा) रामशेज किल्ल्याचा पायथ्याशी संपर्क करावा असं आव्हान आव्हाड यांनी केलं आहे.
    First published:

    Tags: Nashik

    पुढील बातम्या