Home /News /maharashtra /

Nashik: आर्थिक परिस्थितीशी झगडत 21 व्या वर्षी CA बनलेल्या ओमकारनं सांगितला यशाचा मंत्र

Nashik: आर्थिक परिस्थितीशी झगडत 21 व्या वर्षी CA बनलेल्या ओमकारनं सांगितला यशाचा मंत्र

नाशिकचा ओमकार कातकाडे (Omkar Katkade) वयाच्या 21 व्या वर्षीच सीए (Chartered Accountant) बनला आहे. खडतर परिस्थितीशी झगडत त्यानं हे यश मिळवलंय.

    नाशिक 26 जुलै : दरवर्षी लाखो विद्यार्थी सीएच्या (Chartered Accountant) परीक्षेला बसतात. देशातील खडतर परीक्षेमध्ये याचा समावेश आहे. अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा पास होण्यासाठी बरीच वर्ष लागतात. पण नाशिकचा ओमकार कातकाडे (Omkar Katkade, Nashik) त्याला अपवाद आहे. ओमकार वयाच्या 21 व्या वर्षीच सीए बनला आहे.  त्यानं घरातील प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीनं मात करत ही परीक्षा पास केली आहे. कसा झाला प्रवास? ओमकारनं घरातील खडतर परिस्थितीशी झगडत करत CA च्या परीक्षेत यश मिळवलंय, त्यामुळे या यशाचे मोल अधिक आहे. त्याचे वडील एका हार्डवेअर दुकानात काम करतात,आई घर सांभाळते,मोठा भाऊ एका खाजगी कंपनीत अल्पशा मानधनावर काम करतो.अशा परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण कसं करायचं हा पहिला प्रश्न ओमकारपुढे होता. त्यानं शिक्षण तर केलंच. पण अवघ्या 21 व्या वर्षी CA होण्याचा विक्रमही केला आहे. ओमकारचं प्राथमिक शिक्षण रविवार कारंजा येथील बालशिक्षण मंदिरात तर माध्यमिक शिक्षण जनता विद्यालयात झाले.पुढे उच्च माध्यमिक शिक्षण बिवायके महाविद्यालयात पूर्ण केले.  तो लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. त्यामुळे तो नक्की काही तरी भव्य करेल अशी त्याच्या आई वडिलांसह नातेवाईकांना खात्री होती. कष्टाचे फळ ओमकारच्या शिक्षणासाठी त्याच्या वडिलांनी बरेच कष्ट घेतले आहेत. त्यांनी लहान-मोठ्या नोकऱ्या करत ओमकारच्या शिक्षणामध्ये खंड पडणार नाही याची काळजी घेतली. त्यानंही शिक्षण घेताना प्रत्येक टप्प्यावर या कष्टाचं चीज केलं. ओमकारला दहावीत 91 तर बारावीत 87 टक्के मार्क्स होते. सीए-सीपीटी परीक्षेतही त्यानं 200 पैकी 185 मार्क्स मिळवत नाशिकमध्ये पहिला येण्याचा बहुमान मिळवला होता. Nashik: जमिनीवर सरपटत पूर्ण केली सप्तपदी, दिव्यांग जोडप्याच्या लग्नाची गोष्ट वाचून डोळ्यात येईल पाणी 18 तास अभ्यास सीएच्या परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्याचा निश्चय ओमकारने केला होता. अभ्यासक्रमातील सर्वच विषय हे त्यानं आवडीचे करून घेतले होते. तो कधी 12 तास तर 14 तास अभ्यास करत असे. कोरोना काळात लेक्चर ऑनलाईन होतं. त्यामुळे त्याचा क्लाससाठी जाण्या-येण्याचा वेळ वाचे या काळात तर सलग 18 तास अभ्यास केल्याचं ओमकारनं सांगितलं. घरच्या परिस्थितीची संपूर्ण जाणीव असलेल्या ओमकारनं कष्टानं हे यश खेचून आणलं आहे. तो सीए फायनलच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. त्यानं या यशाचं श्रेय आई सुनंदा, वडील शरद,आजोबा सुधाकर आव्हाड यांच्यासह एसव्ही टीटोरियलचे संचालक सीए विशाल पोतदार,सीए समीर तोतले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले आहे. ग्रॅज्युएट असो की 10वी पास राज्यातील 'या' विद्यापीठात बंपर ओपनिंग्स; वाट बघू नका; आताच करा अप्लाय काय आहे यशाची गुरूकिल्ली? 'माझ्या या सर्व प्रवासात आई वडील तर पाठीशी होतेच मात्र गुरुजनांचे चांगले मार्गदर्शन मिळाले,संस्कारक्षम मित्र मिळाले,त्यामुळे मी चांगला अभ्यास करू शकलो. अभ्यासात सातत्य ठेवता आले,माझी ही घरची परिस्थिती बिकट होती. हलाखीची होती,वडील हार्डवेअर दुकानात काम करायचे,मात्र या कठीण परस्थितीवर मात करण्याच मी ठरवलं होत. मी जर माझी नाजूक परिस्थितीचं गाऱ्हाणं सांगत बसलो असतो तर हे यश संपादन करू शकलो नसतो. त्यामुळे अभ्यासात सातत्य आणि गुरुजनांचे मार्गदर्शन हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.' अशी प्रतिक्रिया ओमकारनं Local18 शी बोलताना दिली आहे. 'आम्ही खूप गरिबीत दिवस काढले. त्यामुळे मुलाने आमच्यासारखं काबाड कष्ट न करता, शिकून मोठं व्हाव ही आमची इच्छा होती. त्याच्या शिक्षणासाठी मी मिळेल ते काम केली. त्यानं देखील आमच्या कष्टाची जाणीव ठेवत चांगलं यश संपादन केले आहे. त्यामुळे खूप आनंद वाटतोय. तो खूप हुशार आहे, आणखी पुढे जाईल. त्याच्या पुढील प्रवासात देखील आम्ही पाठीशी आहोत,' भावना ओमकारचे वडील  शरद कातकाडे यांनी व्यक्त केली आहे. श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी जाण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा! इतर विद्यार्थ्यांना सल्ला 'आपलं यश हे परिस्थितीवर नाही तर आपल्या मेहनतीवर अवलंबून असतं. परिस्थिती किती ही बिकट असली तरी ध्येय डोळ्यासमोर ठेवा. ते पूर्ण करण्याच्या निर्धारानं अभ्यास करा. मेहनती शिवाय पर्याय नाही. यशाला शॉर्ट कट नसतो, हे समजून पुढे वाटचाल करा, नक्की यशस्वी व्हाल.' असा सल्ला ओमकारनं दिला आहे. 21 व्या वर्षी CA बनलेल्या ओमकारच्या यशाचा हाच मंत्र आहे.
    First published:

    Tags: Career, Exam result, Nashik

    पुढील बातम्या