नाशिक 5 डिसेंबर : मयुरी धुमाळ यांच्या रूपाने नाशिकच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.युनायटेड नेशन फाउंडेशनच्या डेटा व्हॅल्यू अडव्होकेट फेलोशिपसाठी मयुरी धुमाळ यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे जगभरातून फक्त सात व्यक्तींची या फेलोशिपसाठी निवड झाली त्यात मयुरी यांचं नाव असल्यामुळे संपूर्ण देशासाठी ही गौरवाची बाब आहे. आशिया खंडातून एकमेव विद्यार्थिनी म्हणून मयुरी प्रतिनिधित्व करणार आहे. या फेलोशिपसाठी जगभरातून 65 हून अधिक देशांमधून सुमारे 400 पेक्षा अधिक अर्ज केले गेले होते. ही एक जागतिक चळवळ असून तळागाळातील लोकांना डेटाचे व्हॅल्यू समजावे त्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.निवडलेले हे सात कार्यकर्ते पुढील वर्षात डेटा व्हॅल्यूचे नेतृत्व करतील. अपेक्षित समुदायातील लोकांना डेटा विषयी अधिक मार्गदर्शन करून,त्याचा अयोग्य वापर कसा थांबला पाहिजे,याबाबत ही सविस्तर माहिती देतील. कशी झाली निवड? मयुरी धुमाळ या लहानणापासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. समाजाच्या हिताचे त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. शोषित, पिडीत नागरिकांना आपल्या माहितीचा कसा फायदा होईल, यावर त्या काम करत आहेत. मयुरी सध्या शोधिनी अॅक्शन रिसर्चच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. यात ही डेटा संदर्भात माहिती मिळते. पुस्तक खरेदीवर मिळेल 50 टक्के सूट, पाहा कुठं आहे ही ऑफर? Video ग्रामीण भागावर भर ग्रामीण भागात डेटाचा दुरुपयोग होताना दिसतो. अनेक नागरिकांना त्या विषयी अधिक माहिती नसते. ग्रामीण भागावर मी विशेष लक्ष देणार आहे. विशेषत: ग्रामीण भागातील मुली फारस शिक्षण घेत नाही. त्यांचे लवकर लग्न लवकर लावले जाते. त्यांच्या भविष्याचा विचार केला जातं नाही किंवा त्यांना ही स्वत: भविष्याबाबत फार काही चिंता नसते.जाणीव नसते. हा सर्व डेटा मिळवून तो सरकार पर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहे. औरंगाबादच्या ईशानने 8 मिनिटात सोडवले 103 गणितं! राष्ट्रीय स्पर्धेत आला दुसरा, Video पर्यावरण हा विषय खूप महत्वाचा आहे. त्याचा ही सखोल अभ्यास करून त्याचा ही डेटा मी मिळवणार आहे. पर्यावरण प्रेमींना सोबत घेऊन जनजागृती करणार आहे. जात, धर्म, यांच्यामुळे होणारी हानी, शिक्षणामुळे येणारे अडथळे या विषायवर अधिक काम करणार असल्याची माहिती, मयुरी धुमाळ यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.