मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

औरंगाबादच्या ईशानने 8 मिनिटात सोडवले 103 गणितं! राष्ट्रीय स्पर्धेत आला दुसरा, Video

औरंगाबादच्या ईशानने 8 मिनिटात सोडवले 103 गणितं! राष्ट्रीय स्पर्धेत आला दुसरा, Video

X
एसआयपी

'एसआयपी' अबॅकस इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेच्या फाऊंडेशन 'लेव्हल थ्री' मध्ये ईशान वीर याने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

'एसआयपी' अबॅकस इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेच्या फाऊंडेशन 'लेव्हल थ्री' मध्ये ईशान वीर याने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 05 डिसेंबर : 'एसआयपी' अबॅकस इंडियातर्फे चेन्नईच्या नंदमबक्कम ट्रेड सेंटर येथे आयोजित राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेच्या फाऊंडेशन 'लेव्हल थ्री' मध्ये ईशान मनीष वीर याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. यासह तो स्पर्धेत 'बेस्ट परफॉर्मर' पुरस्काराचाही मानकरी ठरला. ईशान वीर हा औरंगाबाद शहरातील अग्रेसन विद्या मंदिरचा चौथीचा विद्यार्थी असून त्याला मास्टरमाइंड अबॅकस क्लासच्या राधा बजाज यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 6 ते 14 वयोगटातील 3 हजार 800 हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले. ही स्पर्धा अबॅकस आणि विजवल दोन फेऱ्यांमध्ये झाली. यामध्ये विद्यार्थ्यांना 8 मिनिटात गणिताचे 160 प्रश्न सोडवायचे होते. यामध्ये अबॅकस 5 मिनिटाच्या स्पर्धेत 80 गणितं सोडवायची होती. यामध्ये ईशान याने 48 गणितं सोडवले. दुसरी स्पर्धा विजवल यामध्ये 3 मिनिटात 80 गणितं सोडवायची होती. यात ईशान याने 55 गणितं सोडवीत दुसरा क्रमांक मिळवला.

Children Bank : शाळेचे विद्यार्थीच चालवतात 'बचत बँक', पाहा काय आहेत सुविधा, Video

कशी मिळाली अबॅकस बद्दल माहिती?

ईशानची आई आणि ईशान हे दोघे ईशानच्या आईच्या मैत्रिणीकडे गेले होते. यावेळी ईशान हा शाळेमध्ये हुशार असल्याचं ईशानच्या आईने सांगितल्यानंतर त्यांच्या मैत्रिणीने ईशानला अबॅकस बद्दल माहिती दिली व याबद्दल क्लास लावण्याचा सल्ला दिला. ईशान आणि आई घरी आल्यानंतर त्यांनी दोघांनी चर्चा केली. वडिलांनी याबद्दल माहिती घेत ईशानला समजावून सांगितलं. त्यानंतर ईशानला क्लासेस लावले. दोन महिन्याचे क्लास केल्यानंतर ईशानला चेन्नई येथील स्पर्धेची माहिती मिळाली आणि या स्पर्धेमध्ये त्याने सहभाग घ्यायचं ठरवलं.

स्पर्धेमध्ये विजेता झाल्याचा आनंद मला वाटतो

मी चेन्नई येथे गेल्यानंतर स्पर्धक बघून घाबरलो होतो. मात्र, आईने मला धीर दिला. या स्पर्धेमध्ये विजेता झाल्याचा आनंद मला वाटतो.  आयएएस अधिकारी होण्याचं माझं स्वप्न आहे. यासाठी मी प्रयत्न सुरू केले आहेत, असं विजेता ईशान वीर सांगतो.

ईशान जिंकल्याचा आनंद होत आहे

ईशान हा लहानपणापासूनच शाळेमध्ये हुशार आहे. प्रत्येक वर्षी त्याचा पहिला किंवा दुसरा क्रमांक येतो. ईशान जिंकल्याचा आनंद होत आहे, असं ईशानची आई प्रियांका वीर यांनी सांगितलं.

First published:

Tags: Aurangabad, Local18