मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

MLC election : शुभांगी पाटील गेल्या कुठे? गाडी घराऐवजी सापडली मैदानात!

MLC election : शुभांगी पाटील गेल्या कुठे? गाडी घराऐवजी सापडली मैदानात!

शुभांगी पाटील यांची गाडी अंबड परिसरात सापडली आहे. गाडी लावून शुभांगी पाटील सकाळपासून गायब आहे.

शुभांगी पाटील यांची गाडी अंबड परिसरात सापडली आहे. गाडी लावून शुभांगी पाटील सकाळपासून गायब आहे.

शुभांगी पाटील यांची गाडी अंबड परिसरात सापडली आहे. गाडी लावून शुभांगी पाटील सकाळपासून गायब आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  sachin Salve

नाशिक, 16 जानेवारी : नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील अचानक गायब झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. शुभांगी पाटील यांची गाडी अंबड परिसरात सापडली आहे. पण, त्यांचा कुठेही पत्ता नाही.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. अशातच अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्या आहेत. त्यांच्याशी कुणाचाही संपर्क होत नाही.

शुभांगी पाटील यांची गाडी अंबड परिसरात सापडली आहे. गाडी लावून शुभांगी पाटील सकाळपासून गायब आहे. त्यांनी आपली गाडी घरी लावण्याऐवजी समोरच असलेल्या मैदानात लावली आहे. त्यांच्या संपर्क होत नाहीये. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी शुभांगी पाटील यांनी मुंबईत येऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवसेनेनं पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

(हिम्मत असेल तर 'त्यांनी' मुश्रीफांचे..., आता सोमय्यांचे थेट शरद पवारांना आव्हान)

अशातच आज महाविकास आघाडीची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. नाशिक विधान परिषद निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली आहे. बैठकीत अजित पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील सहीत अनेक नेते उपस्थित होते. नाशिक विधान परिषद मतदार संघ निवडणुकीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस पक्ष लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

(MLC election :..आणि 'डॉ.सुधीर तांबे' यांनी अर्ज घेतला मागे, नाशिक विधान परिषद निवडणुकीला नवे वळण)

तर दुसरीकडे, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ.सुधीर तांबे यांच्या नावाने डमी उमेदवार असलेले डॉ.सुधीर सुरेश तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. डॉ.सुधीर सुरेश तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. एकच सारखे नाव असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण डॉ सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म असून देखील अर्ज सादर केला नव्हता. डमी उमेदवार असलेले सुधीर तांबे हे मूळचे पनवेल येथील आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार अमोल खाडे यांची देखील माघार घेतली आहे. 22 उमेदवारांपैकी आतापर्यंत 2 जणानी माघार घेतली आहे.

First published:

Tags: Nashik