नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : लांबचा प्रवास असेल किंवा एखाद्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचता यावं म्हणून बरेच लोक विमान प्रवास करतात. नाशिकचे असेच काही प्रवासी दिल्लीसाठी विमानाने गेले. विमानाने हे प्रवासी नाशिकहून सुखरूप दिल्लीला पोहोचले खरे पण तिथं जाताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्यासोबत असं काही घडलं की तुमचाही संताप होईल. नाशिक-दिल्ली विमानसेवेदरम्यान गोंधळ झाला. स्पाइसजेटच्या या विमानाला उड्डाणाला आधीच तब्बल दीड तास उशीर झाला. त्यानंतर अखेर दिल्लीला ते पोहोचलं. त्यातील प्रवासीही विमानतळावर उतरले. पण त्यानंतर विमान कंपनीचा प्रताप समोर आला. विमानाने प्रवाशांना इच्छित स्थळी लँड तर केलं पण त्यांचं सामानच आणलं नाही. हे वाचा - औरंगाबादमध्ये पुन्हा टोळक्याचा धुडगूस, फटाके फोडण्यावरून तरुणाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, VIDEO स्पाइसजेट एअरलाइन्स कंपनीच्या भोंगळ कारभाराचा शेकडोहून अधिक प्रवाशांना फटका बसला आहे. एकूण 160 प्रवाशांच्या बॅग मिळाल्या नाहीत. हे सामान नाशिकमध्येच राहिलं. प्रवाशांच्या बॅग नाशिकला सोडूनच विमान दिल्लीत दाखल झालं. दिल्लीत पोहोचल्यानंतर ही बाब प्रवाशांच्या लक्षात आली.
विमान कंपनीचा भोंगळ कारभार; सामानाशिवायच नाशिकहून प्रवाशांना घेऊन दिल्लीला पोहोचली फ्लाइट pic.twitter.com/QDAKzquau5
— News18Lokmat (@News18lokmat) October 25, 2022
त्यानंतर नाशिकहून शिर्डीला हे सामान बाय रोड आणि तिथून विमानाने दिल्लीला पाठवण्यात आलं. पण अद्याप हे सामान प्रवाशांना मिळालंच नाही आहे. हे वाचा - VIDEO - ट्रेनचा हॉर्न वाजत होता, लोक ओरडत होते; तरी रेल्वेसमोर आपल्याच धुंदीत चालत राहिली महिला आणि… दुपारी 3.30 वाजल्यापासून प्रवासी आपल्या सामानाची प्रतीक्षा करत आहेत. सामानासाठी 160 प्रवासी दिल्ली विमानतळावरच अडकले आहेत. तुर्कस्तानातही घडला होता असाच प्रकार याआधी यूकेच्या नॉटिंघमशायरसमधील एक कुटुंब तुर्कस्तानात फिरायला गेलं होतं. 14 दिवसांच्या फॉरेन ट्रिपवर ते गेले होते. पण जेव्हा ते तुर्कस्तानात पोहोचले तेव्हा एअरलआइन्सने आपलं सामानच आणलं नाही हे या कुटुंबाला समजलं. त्यांचं लगेज यूकेतच राहिलं होतं. दोन दिवसांत त्यांचं सामान पाठवलं जाईल, असं आश्वान त्यांना कंपनीने दिलं पण तसं झालंच नाही. अखेर त्यांना 14 दिवसांची सुट्टी सामानाशिवायच घालवाली लागली. अंगावर असलेल्या कपड्यांवरच सुट्टी घालवण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांच्या ट्रॅव्हल एजेंटने ट्रिपचं इन्श्यूरन्स केलं होतं. त्यामुळे भरपाई म्हणून त्यांना 14,400 रपये मिळाले.