मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाशिक हादरलं; एका महिन्यात तब्बल 8 जणांनी उचललं टोकाचं पाऊल, काय आहे कारण

नाशिक हादरलं; एका महिन्यात तब्बल 8 जणांनी उचललं टोकाचं पाऊल, काय आहे कारण

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिन्यात 8 जणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिन्यात 8 जणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिन्यात 8 जणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक, 05 फेब्रुवारी : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिन्यात 8 जणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. एका आठवड्यात 3 तरूणांनी आत्महत्या केल्या आहेत. दरम्यान आज पुन्हा हा प्रकार समोर आला आहे आणखी एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. एका आठवड्यात ही तिसरी तर महिन्यातील 8 वी आहे घटना आहे.

येवला परिसरात तरुणांच्या आत्महत्याचे सत्र सुरूच असून आज तालुक्यातील बाबुळगाव येथील 22 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपविले. सागर खुळे असे या तरुणाचे नाव आहे त्याने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अस्पष्ट आहे. एका आठवड्यात ही तिसरी तर महिन्यातील 8 वी घटना आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा : लोणावळ्यात चाललं काय? आलिशान हॉटेलमध्ये न्यूड डान्स, 9 महिलांसह 44 जण नको त्या अवस्थेत सापडले

नाशिक शहरात चार आत्महत्यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत अल्फीया इब्राहिम पिंजारी या अल्पवयीन मुलीने राहत्या घरातील माळ्यावर लोखंडी अँगलला सुती ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मंजू रसूल मंजूर मन्सुरी  यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यास ही माहिती कळवली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसरी घटना म्हाडा कॉलनीत घडली. कविता शरद धंदर या महिलेने काल सकाळी 11 च्या सुमारास राहत्या घरातील बेडरूममधील छताच्या पंख्याला नायलॉनच्या पिवळ्या पट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी विजय चंद्रभान शिरसाठ यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यास ही माहिती कळविली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्येचा तिसरा प्रकार उपनगर येथे घडला. स्वप्नील सीताराम मोरे यांनी राहत्या घरातील इलेक्ट्रिक वायर पंख्याला बांधून गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यावर त्याचा भाऊ प्रदीप मोरे याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा : Pimpari Chinchwad Police : बापरे! 48 बंदुका, 150 कोयते; पुणे पोलिसांच्या मिशन ऑल आउटमध्ये 110 गुंड जेरबंद

स्वतःच्या बंदुकीने हनुवटीवर गोळी झाडून घेत इसमाने आत्महत्या केल्याची घटना शिंगवे बहुला येथे घडली. बाबू मुन्ना कनोजिया असे स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. कनोजिया यांनी काल रात्रीच्या सुमारास स्वतः च्या लायसनधारी सिंगल बोरच्या बंदुकीने हनुवटीवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांचे भाऊ श्याम कनोजिया यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यास ही माहिती कळविली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

First published:

Tags: Nashik, Nashik suicide