जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Pimpari Chinchwad Police : बापरे! 48 बंदुका, 150 कोयते; पुणे पोलिसांच्या मिशन ऑल आउटमध्ये 110 गुंड जेरबंद

Pimpari Chinchwad Police : बापरे! 48 बंदुका, 150 कोयते; पुणे पोलिसांच्या मिशन ऑल आउटमध्ये 110 गुंड जेरबंद

Pimpari Chinchwad Police : बापरे! 48 बंदुका, 150 कोयते; पुणे पोलिसांच्या मिशन ऑल आउटमध्ये 110 गुंड जेरबंद

पिंपरी चिंचवड शहरातील वाढते गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवलं आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

गोविंद वाकडे (पिंपरी चिंचवड) 05 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवड शहरातील वाढते गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवलं आहे. शेकडो शस्त्रे त्याचबरोबर शंभरहून अधिक कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद पोलिसांनी जेरबंद केलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याने सर्वत्र चर्चा केली जात आहे. दरम्यान पोलीस कारवाईत 48 बंदुका, 89 जिवंत काडतुसे, 150 कोयते जप्त करण्यात आले आहेत.

जाहिरात

काळजात धडकी भरवणारा हा शस्त्रसाठा पिंपरी चिंचवड पोलिसांनी केवळ पंधरा दिवसात हस्तगत केला आहे. हा शस्त्रसाठा बाळगणारे गुन्हेगार खुलेआम आपली दहशत माजवत होते. उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारांचे नेमके काय उद्योग सुरू आहेत हे सगळ्यांना दिसत आहे. हेच उद्योग हद्दपार करण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मिशन ऑल आउट राबवले आहे. दरम्यान यातून सुमारे दीडशे गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा :  Viral : ‘या’ चोराला कुठे शोधायचं पोलिसांना प्रश्न ? CCTV मध्ये चोर तर दिसला पण…

पिंपरी चिंचवड पोलीस दलातील गुंडाविरोधी पथकाने ही कामगारी  करत हा शस्त्रसाठा जप्त केला आहे. विशेष  म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेलं या ऑपरेशनमध्ये पिंपरी शहरातील गुंडांच्या सात कुख्यात टोळ्या विरुद्ध  मोका अंतर्गत  कारवाई करत सुमारे 110 गुन्हेगारांच्या मुसक्याही आवळल्या गेल्या आहेत.

जाहिरात

अनिल तुकाराम मोहिते टोळी आणि त्यातील, 10 सदस्य, हिरा बहादुर हमाल टोळी व 07 सदस्य, शुभम सुरेश म्हस्के व इतर 17, दत्ता बाबु सुर्यवंशी व इतर 3, आकाश राजू काळे व इतर 06, विशाल विष्णू लष्करे व इतर 30, कुणाल धिरज ठाकुर व इतर 29, अक्षय मुकुंद गायकवाड एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  लोणावळ्यात चाललं काय? आलिशान हॉटेलमध्ये न्यूड डान्स, 9 महिलांसह 44 जण नको त्या अवस्थेत सापडले

पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांची धाबे दणाणले आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरातील अशा गुन्हेगारांना आश्रय देणारे व्हाईट कॉलर गुन्हेगार अजूनही मोकाट आहेत. शहरातील गुन्हेगारी  मुळापासून उखडून फेकायची झाल्यास पोलिस गुन्हेगारीच्या मुळापर्यंत पोहचतील का हा खरा प्रश्न आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात