Home /News /maharashtra /

नाशिकमध्ये भरदिवसा उद्योजकाची हत्या; तलवारीने सपासप वार करुन संपवलं, CCTV आला समोर

नाशिकमध्ये भरदिवसा उद्योजकाची हत्या; तलवारीने सपासप वार करुन संपवलं, CCTV आला समोर

नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरूच; भरदिवसा उद्योजकाची हत्या, तलवारीने सपासप वार करत संपवलं, CCTV आला समोर

नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरूच; भरदिवसा उद्योजकाची हत्या, तलवारीने सपासप वार करत संपवलं, CCTV आला समोर

Nashik murder: नाशिकमध्ये भरदिवसा एका उद्योजकाची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 7 जून : नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना आणि हत्यासत्र काही थांबताना दिसत नाहीये. गेल्या 18 दिवसांत नाशिकमध्ये 8 हत्या (8 murder in 18 days) झाल्या आहेत. आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका उद्योजकाची भरदिवसा हत्या (businessman brutally killed in Nashik) करण्यात आली आहे. नाशिकमधील अंबड परिसरात ही हत्या झाली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत कंपनीच्या गेटवर उद्योजकावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात संबंधित उद्योजकाचा मृत्यू झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी उद्योजकाची हत्या करुन घटनास्थळावरुन पळ काढला. आरोपी पळून जात असतानाची दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नंदकुमार आहेर असं मृतकाचे नाव आहे. नंदकुमार आहेर हे सकाळी आपल्या कंपनीत जात होते. कंपनीच्या गेटवर पोहोचताच बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यानंतर आरोपींनी पळ काढला. या हल्ल्यात नंदकुमार आहेर हे गंभीर जखमी झाले. वाचा : पुण्यातील सराफाला पाण्याची बाटली पडली 30 लाखांना, STतून उतरताच घडला भयंकर प्रकार नंदकुमार आहेर यांच्या ओरडा-ओरड ऐकून कंपनीतील कामगार, सुरक्षारक्षक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा नंदकुमार आहेर हे रस्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 18 दिवसांत 8 हत्या नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या 18 दिवसांत 8 हत्येच्या घटना घडल्या आहेत. तर नाशिक शहरात गेल्या 2 दिवसांत तीन जणांवर प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील तरुणाची नाशिकमध्ये निर्घृण हत्या गेल्या महिन्यात नाशिकच्या पूर्णिमा बस स्टॉप परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. लुटमारीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्येची ही घटना घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (caught in CCTV) झाली आहे. हरीश पटेल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. हत्या झालेला हरीश पटेल हा युवक पुणे येथील राहणार असल्याची माहिती समोर आली होती.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Cctv footage, Crime, Murder, Nashik

    पुढील बातम्या